Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

जगातील टॉप 10 सर्वात मोठे धबधबे!

जगातील टॉप 10 सर्वात मोठे धबधबे!
उंच पर्वतशिखरावरून वेगाने खाली कोसळणारा जलप्रपात पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. जगात अनेक ठिकाणी सुंदर धबधबे आहेत. त्यापैकी सर्वात मोठ्या दहा धबधब्यांची ही माहिती. या धबधब्यांमधून कोसळणार्‍या पाण्याच्या प्रमाणावरून त्यांचा हा क्रम ठरवण्यात आला आहे.

इंगा

डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये हा भव्य धबधबा आहे. त्यातून सेकंदाला 42,476 क्युबिक मीटर इतके पाणी खाली कोसळते. हा जगातील सर्वात मोठा धबधबा आहे.


लिव्हिंगस्टोन
webdunia
 
WD

हा धबधबाही कांगोमध्येच आहे. त्यातून सेकंदाला 35,113 क्युबिक मीटर इतके पाणी खाली कोसळते.


बोयोमा
webdunia
 
WD

कांगोमधीलच या धबधब्याचा जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांमध्ये तिसर्‍या क्रमांकावर वर्णी लागली आहे. म्हणजे जगातील सर्वात मोठे असे पहिले तीन धबधबे कांगोमधीलच आहेत. या धबधब्यामधून सेकंदाला 16,990 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळले.


खोन
webdunia
WD

हा धबधबा लाओसमध्ये आहे. त्यातून सेकंदाला 10,783 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळते.


सेलिलो
webdunia
WD

हा धबधबा अमेरिकेत आहे. मात्र आपल्याला अमेरिकेतील केवळ नायगारा धबधबाच माहिती असतो! सेलिलो धबधब्यामधून सेकंदाला 5,415 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळते.


सॉल्टो पारा
webdunia
WD

हा धबधबा व्हेनेझुएलामध्ये आहे. त्यामधून सेकंदाला 3,540 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळले.


पावलो अफोन्सो
webdunia
WD

हा धबधबा ब्राझिलमध्ये आहे. त्यामधून सेकंदाला 2,832 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळते.


नायगारा
webdunia
WD

जगप्रसिद्ध नायगारा धबधबा अमेरिका आरि कॅनडाच्या सीमेवर आहे. तो सर्वाधिक रुंद धबधब्यांच्या यादीत दहाव्या स्थानावर असून त्याची रुंदी 1203 मीटर आहे. या धबधब्यामधून सेकंदाला 2,407 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळते.


इग्वाझू
webdunia
WD

हा धबधबा अर्जेटिना व ब्राझिलच्या सीमेवर आहे. त्यामधून सेंकदाला 1,746 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळते.


व्हिक्टोरिया
webdunia
WD

हा धबधबा झिम्बाव्हे आणि झाम्बियाच्या सीमेवर आहे. त्यातून 1,088 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळते.


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमान दोषी, शिक्षा मात्र निर्मात्यांना, ५०० कोटीहून अधिक रुपये पणाला