Daily Horoscope
✕

रोमँटिक हनिमूनसाठी भारतातील या 5 ठिकाणी भेट द्या

Webdunia
गुरूवार, 30 जानेवारी 2025 (07:30 IST)
India Tourism : सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. लग्नानंतर, जोडपे आपला चांगला वेळ घालवण्यासाठी हनिमूनची योजना आखतात. पण कधीकधी, खूप विचार करूनही, जोडप्यांना कोणतेही ठिकाण अंतिम करता येत नाही. याकरिता या लेखात भारतातील अशी काही पाच ठिकाण दिले आहे जिथे तुम्हाला नक्कीच कमी बजेट मध्ये जाता येईल व तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नक्कीच रमणीय वेळ घालवू शकाल. कारण भारतात अशी काही सर्वोत्तम ठिकाणे आहेजिथे तुम्ही तुमचा हनिमून खास बनवू शकता. तर चला जाणून घेऊ या भारतातील पाच ठिकाणांबद्दल
ALSO READ: Travel :हिवाळ्याच्या हंगामात भारतात या ठिकाणी भेट द्या
अंदमान निकोबार-
हनिमूनसाठी तुम्ही अंदमान निकोबारला नक्कीचजाऊ शकतात. हा बंगालच्या उपसागरात स्थित बेटांचा समूह आहे. या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारे आणि वातावरण जोडप्यांना आकर्षित करेल, जे त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम आठवणींपैकी एक बनेल.

 
रोमँटिक गोवा-
नवविवाहित जोडपे त्यांच्या रोमँटिक हनिमूनसाठी गोव्याला जाऊ शकतात. येथे अंजुना बीच, मोरजिम बीच, मँड्रेम बीचसह अनेक समुद्रकिनारे आहे. जिथे तुम्ही तुमच्या आयुष्यातील रोमँटिक आठवणी जपू शकता. याशिवाय, गोव्यातील नाईटलाइफसह शांत वातावरण तुम्हाला खूप आकर्षक वाटेल.

ऊटी-
जर तुम्ही तुमच्या हनिमूनसाठी दक्षिण भारतात जाण्याचा विचार करत असाल तर उटी हे तुमच्यासाठी खूप चांगले ठिकाण ठरू शकते. ऊटी हे तामिळनाडू राज्यातील नीलगिरी टेकड्यांमध्ये वसलेले आहे. येथील मनमोहक दृश्ये आयुष्यभर तुमच्या मनात राहतील. भारतीयांव्यतिरिक्त, परदेशी पर्यटक देखील येथे येतात. तुम्ही ऊटी लेक, निलगिरी माउंटन रेल्वे राईड, कुन्नूर आणि रोझ गार्डनला भेट देऊन आनंद घेऊ शकता.

जम्मू आणि काश्मीर-
जम्मू आणि काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग मानले जाते. हिवाळ्यात येथे टेकड्या बर्फाने झाकलेल्या राहतात, जे खूप मोहक दिसतात. नवविवाहित जोडप्याच्या हनिमूनसाठी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असू शकते. वैष्णोदेवी मंदिरासह तुम्ही दाल सरोवर, गुलमर्ग हिल्स, पहलगाम, सोनमर्ग अशा अनेक ठिकाणी भेट देऊ शकता.

गंगटोक-
नवविवाहित जोडप्याच्या हनिमूनसाठी गंगटोक हे खूप चांगले ठिकाण ठरू शकते. येथील उगवणारा सूर्य खूप आकर्षक असतो जो अनेकांना आकर्षित करतो. याशिवाय, येथील शांत वातावरण, तलाव आणि निसर्गाच्या अद्भुत दृश्यांचा आनंद घेता येतो.<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

नवीन

अक्षय कुमारचा शत्रू यावेळी माणूस नसून एक एलियन असेल! 'समूक'चा थरारक फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; ५ आरोपींची तुरुंगात रवानगी, सुनेहा पंडित २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत

बाहुबली फेम अभिनेत्री रम्या कृष्णनने कृष्णा वम्सीसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले

जिमी शेरगिल, अध्ययन सुमन आणि प्रनूतन बहल अभिनीत ' प्यादे'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

रामायण चित्रपटमधील जटायूची कथा तुम्हाला भावली असेल, तर केरळमधील जगातील सर्वात मोठी जटायू मूर्ती नक्की पाहा

पुढील लेख
Show comments