Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

बिहारात सहा उमेदवार मुख्यमंत्रिपदाचे दावेदार

बिहारात सहा उमेदवार मुख्यमंत्रिपदाचे दावेदार
नवी दिल्ली , बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (08:10 IST)
राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात 17व्या बिहार विधानसभेत यंदा एक नव्हे, एकूण सहा उमेदवार मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून रिंगणात उतरले आहेत.
 
याआधी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र किंवा झारखंडमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून एक किंवा दोन नेत्यांना समोर केले जाते होते. बिहारमध्ये मात्र ही संख्या अर्ध्या डझनावर गेली. त्यापैकी चार वेगवेगळ्या आघाड्यांचे नेते आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार रालोआचा चेहरा आहेत. महाआघाडीकडून तेजस्वी यादव, ग्रँड डोमेक्रॅटिक सेक्युलर फ्रंटकडून उपेंद्र कुशवाह यांच्यानंतर प्रगतिशील लोकशाही आघाडीकडून राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादवदेखील सहभागी आहेत. नवोदित पक्ष प्लूरल्सच्या पुष्पम प्रिया चौधरी व लोजपचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवानदेखील मैदानात आहेत.

33 वर्षीय पुष्पम प्रिया लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थिनी आहेत आणि त्यांनी राजकारणात थेट प्रवेश करून स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्याचे जाहीर केले. चिराग यांच्या पक्षाकडून सातत्याने त्यांना पुढे केले जात आहे. सत्तेच्या दावेदारांपैकी केवळ तेजस्वी (राघोपूर), पप्पू यादव (मधेपुरा), पुष्पम प्रिया चौधरी या बांकीपूर आणि बिस्फीमधून निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार विधान परिषदेचे सदस्य आहेत. रालोसपाप्रमुख उपेंद्र कुशवाहदेखील निवडणूक लढवत आहेत. चिराग अद्यापही जमुईचे खासदार आहेत. त्यातही रंजक म्हणजे मैदानातील कोणताही पक्ष स्वबळावर सरकार बनवण्याच्या स्थितीत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माउथवॉशमुळे मानवांमध्ये कोरोना विषाणूचा धोका उद्भवू शकतो, अभ्यासात असा दावा करण्यात आला