Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Baal kavi Thombre Jayanti Vishesh :बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे

Webdunia
शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (21:50 IST)
Baal kavi Thombre Jayanti Vishesh :बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. यांचा जन्म महाराष्ट्राच्या धरणगाव येथे 13 ऑगस्ट 1890 रोजी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव बापूराव देवराव ठोंबरे होते.आणि आई गोदाताई.ठोंबरे.त्यांचे वडील बापूराव हे पोलीस खात्यात असल्याने वारंवार त्यांच्या बदल्या होत होत्या. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात खंड पडत होता. निसर्गातच त्यांनी आपले शिक्षण घेतले.त्यांनी आपल्या मोठ्या बहिणीच्या सानिध्यात येऊन काव्याचे वाचन केले .त्यांच्या बहिणीमुळेच त्यांच्यात कवितेचे आवड निर्माण झाली.त्यांनी नाशिकला संस्कृत तर पुण्यात इंग्रजीचे अध्ययन घेतले.
 
त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांची आर्थिक परिस्थिती विकट झाली.थोरल्या आणि धाकट्या भावाचा त्रास त्यांना सहन करावा लागला. त्यांचे लग्न विनायक जोशी यांची कन्या पार्वतीबाई सह झाले.पण त्यांना कौटुंबिक सुख मिळाले नाही. त्यांचे त्यांच्या पत्नीशी जुळले नाही. आणि त्यांचे वैवाहिक जीवन अयशस्वी झाले. त्यांनी आपल्या पोटासाठी वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या.
 
मराठी लेखक आणि कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्याबरोबर त्यांनी बालपणातील काही काळ घालवला .रेव्हरंड नारायण वामन टिळक. यांनी त्र्यंबकमधील प्रतिभा ओळखून त्यांना आपल्या घरी आणले. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई टिळक या  बालकवींना मुलगा मनात असे. त्यांचे मातृत्वाचे संबंध होते. बालकवी टायफॉईडने आजारी असताना रेव्ह. टिळकांनी व लक्ष्मीबाईंनी अवघे चाळीस दिवस त्यांची काळजी घेतली.
 
 जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना 'बालकवी' ही उपाधी दिली.या कविसंमेलनाने बालकवी साहित्यरसिकांना ज्ञात झाले .
त्यांना निसर्गाची ओढ बालपणापासूनच होती.  या वयातच त्यांना राष्ट्रीय कीर्तनकार वनवासी उपाख्य रामचंद्र कृष्ण वैद्य यांचा सहवास लाभला .तर पुण्याच्या वास्तव्यात गोिवदाग्रज, दिवाकर यांचा सहवास लाभला
 
वनवासींसह बालकवींनी निसर्गाच्या विविध छटा अनुभवल्या.त्यांनी वनवासींच्या कीर्तनासाठी काव्य रचना केली.कमी वयातच वनवासींचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना घरी परतावे लागले.। निसर्गाच्या सहवासात बालकवींनी जीवनाचे अनेक रंग अनुभवले. या निसर्गातच बालकवी रमले. त्यांनी निसर्गाची मधुर गाणी बालकवी यांनी गेले.
निसर्गविषयक कवितांशी बालकवींच्या जीवनाचा साक्षात संबंध आहे. म्हणूनच त्या भावोत्कट, या अनुषंगाने हृदयस्पर्शी उतरल्या आहेत. बालकवींनी प्रकृतीच्या पर्यवेक्षणात रात्रीमागून रात्र आणि दिवसामागून दिवस घालवले होते.यांचे निधन जळगावला असताना 5 मे 1998 रोजी झाले. 

बालकवींच्या प्रसिद्ध कविताआहेत-
आनंदी आनंद गडे
औदुंबर
फुलराणी
श्रावणमास

त्यांची काही पुस्तके- 
* फुलराणी : बालकवींच्या निवडक कविता
* बालकवींच्या निवडक कविता
* बालकवींच्या बालकथा (आत्मकथन)
* बालकवींच्या बालकविता
* बालविहग (कवितासंग्रह, )
* समग्र बालकवी
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू

आयपीएस अधिकारी मनोज कुमार वर्मा यांची कोलकाताचे नवे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

भारतीय हॉकी संघाने चीनला हरवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले

आप खासदार स्वाती मालीवाल यांनी आतिशीच्या सीएम बनण्यावर प्रतिक्रिया दिली, म्हणाल्या-

सिसोदिया यांच्या दबावाखाली आतिशी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा भाजपच्या प्रमुखांचा दावा

पुढील लेख