Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बायोग्राफी बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर

Webdunia
रविवार, 4 एप्रिल 2021 (09:40 IST)
हे महाराष्ट्रातील आद्य पत्रकार होते. यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1846 रोजी महाराष्ट्रातील पोंभुर्ले येथे झाला. यांनी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरु केले.
यांनी आपल्या वडिलांकडून मराठी आणि संस्कृत भाषेचे धडे शिकले. नंतर ते 1825 साली मुंबईत आले आणि तिथे त्यांनी सदाशिव काशिनाथ ज्यांना बापू छत्रे म्हणून संबोधित करायचे आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्या कडे इंग्रजी आणि संस्कृतची शिकवणी घेतली. त्याच बरोबर ते  गणित आणि शास्त्र विषयात देखील प्रावीण्य झाले.त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी प्राध्यापक नियुक्त होण्या इतपत ज्ञान मिळविले. मुंबईतील एल्फिस्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून नियुक्त झाले. कॉलेजात असताना आणि समाजात वावरताना त्यांना अनेक अडचणींना सामोरी जावे लागले. समाजातील अनेक रूढी,चालीरीती,भाकड समजुतीचा त्रास त्यांना सोसावा लागला. त्यासाठी महाविद्यालयात केवळ शिकवून उपयोग नसून समाजाला काही धडे दिले पाहिजे  आणि त्यासाठी वृत्तपत्र काढावे. असा विचार त्यांनी केला आणि आपले सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे ज्यांना भाऊ महाजन देखील नावाने ओळखतात त्यांच्या मदतीने 'दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र काढले. या मध्ये मजकूर इंग्रजी आणि मराठी भाषेत असायचा.त्या वर्तमान पत्राची किंमत 1 रुपया होती.हे वृत्तपत्रा काढण्याचा मुख्य उद्देश्य लोकांना देशाची समृद्धी आणि लोककल्याण चा स्वतंत्र विचार करता यावा हा होता. लोकांना त्यांचे विचार पटू लागले त्यांचे विचार लोकांमध्ये रुजत गेले आणि या  वृत्तपत्राला चांगला प्रतिसाद मिळत गेला.
बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे उत्तम ज्ञान होते. फ्रेंच भाषेसाठी फ्रान्सच्या राजाकडून त्यांना गौरविण्यात आले असे.मुद्रित स्वरूपात ज्ञानेश्वरी त्यांच्या मुळेच  प्रथम वाचकांच्या हाती आली.ते गणित आणि ज्योतिषात देखील पारंगत होते. शिवाय त्यांना  रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान होते.त्यांची नेमणूक कुलाबा वेधशाळेच्या संचालक पदी नियुक्ती झाली. तसेच मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून नेमणूक झाल्यावर त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. आणि शिक्षणाच्या संदर्भात मोलाची भूमिका बजावली. महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार करून  वेगवेगळ्या विषयांची अभ्यास पाठ्य पुस्तके इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र  त्यांनीच लिहिली. 
दर्पण या वृत्तपत्रावर त्यांचा विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटला होता. दर्पण हे वृत्तपत्र तब्बल साडेआठ वर्ष चालले आणि जुलै 1840 मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. 
भारतीय समाजातील व हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात हे त्यांचे विचार होते. विधवा विवाह,पुनर्विवाह, स्त्री शिक्षण या साठी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अशा प्रकारे जांभेकरांनी सुधारणावादाचा, जीवनवादाचा,परिवर्तन वादाचा पाया घातला. त्यांचे विचार प्रगमनशील होते. त्यांनी आपले योगदान महाराष्ट्राला आणि भारताला दिले. 
त्यांचे निधन आजारानंतर मुंबईत झाले.   
बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र सरकारतर्फे 'दर्पण दिन' अथवा 'वृत्तपत्र दिन' म्हणून साजरा होतो.
ज्या 6जानेवारी रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तोच 6 जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे, हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.त्यांच्या उत्कृष्ट कारगिरीला मानाचा मुजरा.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi पाकिस्तानची भाषा बोलत आहे काँग्रेस, पंतप्रधान मोदी पुण्यात म्हणाले

शांततेच्या नोबेल पुरस्काराचे पात्र पंतप्रधान मोदी, मार्क मोबियस यांचा मोठा दावा

खाटूश्याम मंदिरात चेंगराचेंगरी, 7 भाविक जखमी

बसच्या धडकेत चौथीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

सहा मजली इमारतीला भीषण आग, 42 जणांना सुखरूप बाहेर काढले

पुढील लेख
Show comments