Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Maharana Pratap Jayanti 2023: महाराणा प्रताप इतिहास

Maharana Pratap Jayanti
, सोमवार, 22 मे 2023 (10:30 IST)
जगभरात 9 मे रोजी महाराणा प्रताप जयंती साजरी केली जाते. त्यांचा जन्म 9 मे 1540 साली मेवाड येथे झाला होता. त्यांच्या शौर्याबद्दल कथा सांगितल्या जातात. त्याच्या भूमीला त्याच्या शौर्याचा अभिमान आहे. त्या काळात ते एकमेव असे नायक होते, ज्यांचे शत्रू देखील अभिवादन करत असे.
 
महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू पराक्रमी राजपूत होते. महाराणाचे पूर्वज मेवाडचे शासक आणि त्यांचे हिंदुवंश भगवान राम यांनी उत्पन्न केलेले सूर्यवंशी वंशातले होते.
 
महाराणा प्रताप जीवन परिचय
महान योद्धा महाराणा प्रताप यांचा जन्म राजस्थानमधील मेवाडमधील राजपूत कुटुंबात 9 मे 1540 रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव राणा उदयसिंह आणि आईचे नाव जयवंताबाई होते. तर त्यांच्या पत्नीचे नाव अजबडे पुनवार असे. त्यांना दोन पुत्र होते, अमरसिंह आणि भगवान दास. महान योद्धा महाराणा प्रताप ज्या घोड्याची स्वारी करत होते त्याचं नाव चेतक असे होते. चेतक देखील महाराणा प्रतापांप्रमाणेच योद्धा होता. महाराणा प्रताप लहानपणापासूनच शूर योद्धा होते. त्याने लहानपणापासूनच लढाईचे कौशल्य शिकले होते. तथापि, ते नायक आणि योद्धा असूनही धर्म पारायण आणि मानवतेचे पुजारी होते. त्यांनी माता जयवंताबाई यांना आपले पहिले गुरु मानले होते.
 
मोगलांचा चित्तोडवर हल्ला 
राणा उदईसिंग यांना तीन राण्या होत्या - त्यापैकी राणी धीरबाई त्यांची सर्वात प्रिय होती. आपला मुलगा जगमाल राणा राजा व्हावा अशी राणी धीरबाईंची इच्छा होती. त्याच वेळी शक्तीसिंह आणि सागर सिंग यांनासुद्धा सिंहास हवं होतं परंतू प्रजा आणि राणा उदय सिंह हे स्वत: ला महाराणा प्रतापांचा उत्तराधिकारी मानत होते. या गृह-क्लेशाचा फायदा घेत मोगलांनी चित्तोडवर हल्ला केला. या युद्धात राजपूत राजांना पराभवाला सामोरे जावे लागले. अनेक राजांनी अकबरसोमर गुघडे टेकले, ज्यामुळे मोगलांचा मनोबल वाढले. तरी राणा उदय सिंह आणि प्रताप यांनी मोगलांशी युद्ध केले आणि मोगलांच्या अधीनतेला वीरगती प्राप्त होयपर्यंत स्वीकाराले नाही. तथापि, घरात कलह आणि द्वेषामुळे राणा उदय सिंह आणि प्रताप हा चित्तोडचा किल्ला गमावून बसले. नंतर महाराणा प्रताप यांनी प्रजेच्या भल्यासाठी चित्तोड सोडून बाहेरुन प्रजेला सुरक्षा प्रदान करतात.
 
हळदीघाटीची लढाई
सन 1576 मध्ये अकबरच्या 8000 सैनिकांनी एकत्र युद्धाचं शंखनाद केलं, ज्याचं नेतृत्व राजा मान सिंह करत होते. तर महाराणा प्रताप यांना अफगाण राजांचा पाठिंबा होता. असे म्हणतात की हकीम खान सूर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रतापसाठी लढा दिला. हळदीघाटीची लढाई अनेक दिवसांपर्यंत सुरु होतो, परंतू शेवटी प्रतापच्या सैन्याला पराभवाचा सामना करावा लागला. प्रताप यांच्या पराभवाबद्दल असे म्हणतात की या पराभवाचे कारण म्हणजे राज्यात धान्य नसणे असे होते. त्यावेळी राजपूत महिलांनी जौहर केला. सैन्यात लढाईत वीरता मिळाली.
 
मेवाडचा विजय
बंगाल आणि बिहारमधील बंडखोरी आणि मिर्झा हकीम यांनी पंजाबमध्ये घुसखोरी केल्यानंतर 1579 नंतर मेवाडवरील मोगलांवरील दबाव कमी झाला. 1582 मध्ये, महाराणा प्रतापने देवर येथे मुघल चौकीवर हल्ला केला आणि ती ताब्यात घेतली. यामुळे मेवाडमधील मोगल सैन्याच्या सर्व 36 चौक्या ताब्यात आल्या. या पराभवानंतर अकबरने मेवाडविरुद्धची सैन्य मोहीम थांबवली. देवरचा विजय हा प्रतापसाठी एक मुख्य अभिमानाचा विषय होता. इतिहासकार जेम्स टॉडने "मेवाडचे मॅरेथॉन" असे वर्णन केले आहे. अकबर लाहोरला गेला आणि वायव्येकडील परिस्थिती बघून पुढील बारा वर्षे तिथेच राहिले. या काळात कोणतीही मोठी मोगल मोहीम मेवाडला पाठविली गेली नव्हती. परिस्थितीचा फायदा घेत प्रताप यांनी कुंभलगड, उदयपूर आणि गोगुंडासह पश्चिम मेवाड ताब्यात घेतले. या काळात त्यांनी आधुनिक डुंगरपूरजवळ चवंद ही नवीन राजधानीदेखील बांधली.
 
29 जानेवारी 1597 रोजी वीर गती प्राप्त झाली
या युद्धामध्ये प्रतापचा घोडा चेतक जखमी झाला आणि 21 जून 1576 रोजी नदी ओलांडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या युद्धानंतर प्रताप जंगलातच राहू लागले आणि या काळात 29 जानेवारी 1597 ला 57 वर्षाच्या वयात त्यांना वीर गती प्राप्त झाली. हळदीघाटीची लढाईत महाराणा प्रताप यांचे पराक्रम पाहून स्वत: अकबरने त्यांची स्तुती केली आणि त्यांचे वर्णन एक महान योद्धा म्हणून केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Maharana Pratap महाराणा प्रताप यांच्याबद्दल माहिती