Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनोवैज्ञानिक थ्रिलर असलेल्या ‘माफिया’चा ट्रेलर प्रदर्शित

college reunion
, शनिवार, 4 जुलै 2020 (12:24 IST)
ओरिजनल अनोखी मनोवैज्ञानिक थ्रिलर ‘माफिया’ सीरिज प्रदर्शनासाठी सज्ज झाली असून सीरिजचा थ्रिलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. या सीरिजचे प्रिमिअर १० जुलै ZEE 5 वर रोजी होणार आहे.

ट्रेलरची सुरुवात मित्रांच्या एका ग्रुपच्या एका काळ्या घनदाट जंगलातील रीयूनियनच्या शॉट्सने होते. मात्र ते वास्तवात एकमेकांचे सर्वात चांगले मित्र आहेत का? ट्रेलरमध्ये शोच्या कथानकाला पुढे नेले जाते जेव्हा हा ग्रुप माफिया नावाच्या एका सोशल डिडक्शनच्या खेळाची सुरुवात करतो. हा खेळ दर्शकांना वास्तवात धरून ठेवतो आणि या रहस्यमय ड्रामाला एका मनोवैज्ञानिक थ्रिलरमध्ये बदलणाऱ्या सहा खेळाडूंच्या आयुष्यात ओढून नेतो. काय हे सहाही जण जीवनाच्या या फेऱ्यातून वाचतील? की ते एक दुसऱ्यांविरुद्ध या खेळात उतरून आपल्या पूर्वायुष्यातील एखाद्या गडद सत्याला उजेडात आणतील?

माफिया ट्रेलरच्या प्रदर्शनावर अभिनेता नमित दास म्हणाला की, “हा शो रहस्य आणि मनोवैज्ञानिक थ्रिलर यांचे योग्य मिश्रण आहे. ट्रेलरमध्ये यातील काही अंशांची झलक सादर करण्यात आली असली तरी खरे ट्विस्ट तेव्हा समोर येते जेव्हा यातील व्यक्तिरेखा खेळ खेळायला सुरुवात करतात. हे या शोच्या कथानकला पूर्णपणे बदलून टाकतो. या खेळात एका बेशुद्ध पडलेल्याची खरीखुरी हत्या होते. जीवनाच्या या खेळात कोण वाचणार आणि कोण एक-दूसऱ्याच्या विरुद्ध उतरणार, हे जाणण्यासाठी दर्शकांना 10 जुलैला झी 5 वर हा शो पहावा लागेल. मी स्वत: याबाबत दर्शकंच्या प्रतिक्रियांसाठी उत्सुक आहे”

ही सीरिज लोकप्रिय सोशल डिडक्शन बोर्ड गेम माफियावर आधारित आहे. बिरसा दासगुप्ता द्वारा दिग्दर्शित, एस्के मूवीज़ द्वारे निर्मित आणि रोहन घोष व अरित्रा सेन द्वारे रचित, या शो मध्ये नितिनच्या रूपात नमित दास, ऋषिच्या रूपात  तन्मय धननिया, रिद्धिमा घोष, अनन्याच्या रूपात ईशा एम साहा, नेहाच्या रूपात अनिंदिता बोस आणि तान्याच्या रूपात  मधुरिमा रॉय प्रमुख भूमिकेत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Motivational very short story 1