Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या १० दक्षिण भारतीय चित्रपटांचा बॉलिवूडमध्ये येणार रिमेक; बघा, कोणते आहेत हे चित्रपट

Webdunia
शुक्रवार, 27 मे 2022 (21:30 IST)
एकीकडे हिंदी आणि दक्षिण भारतीय भाषांबाबत यापूर्वी बरेच वाद झाले आहेत, तर दुसरीकडे दक्षिण भारतीय चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. बॉलीवूडमध्ये बऱ्याच काळापासून दक्षिण भारतीय चित्रपटांचे रिमेक केले जात आहे आणि आगामी काळातही हा ट्रेंड थांबणार नाही. या यादीमध्ये आता बॉलीवूडमध्ये रिमेक होणाऱ्या 10 सर्वोत्कृष्ट दक्षिण भारतीय चित्रपटांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
 
1. 2021 मल्याळम चित्रपट ‘द ग्रेट इंडियन किचन’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट इतर भाषांतील लोकांनाही प्रादेशिक भाषेत पाहिला आणि आवडला. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
 
2. विजय सेतुपती आणि त्रिशा तामिळ चित्रपट 96 मध्ये मुख्य भूमिकेत दिसले. हा चित्रपट एका शाळकरी जोडीदाराची कथा आहे जो 22 वर्षांनंतर पुन्हा भेटतो. चित्रपटाच्या हिंदी हक्कांसाठी बोलणी संपली असून, लवकरच अधिक तपशील समोर येईल अशी अपेक्षा आहे.
 
3.मल्याळम चित्रपट ड्रायव्हिंग लायसन्स हा एक विनोदी चित्रपट आहे, त प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटात सूरज आणि पृथ्वीराज मुख्य भूमिकेत होते. सेल्फीच्या नावाने हा चित्रपट रिमेक केला जात आहे, यामध्ये इमरान हाश्मी आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
 
हा मल्याळम सर्व्हायव्हल चित्रपट आहे, यात फ्रीझरमध्ये अडकलेल्या मुलीची कथा आहे. या चित्रपटाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा हिंदीत ‘मिली’ नावाने रिमेक होत आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि सनी कौशिक दिसणार आहेत.
 
4,मन्नाग्रामची गणना तमिळ सिनेमातील आधुनिक क्लासिक चित्रपटांमध्ये केली जाते. या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाचा हिंदी रिमेक मुंबईकर या नावाने बनवला जात असून त्यात विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर विजय सेतुपती यांचा हा पहिलाच चित्रपट असेल.
 
5.कैथी ही एका कैद्याची कथा आहे आपल्या मुलीला भेटण्यासाठी काहीही करेल. चित्रपटात वडिलांच्या भावना चांगल्या प्रकारे दाखविण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत असणार असून भोलाच्या रुपात त्याचा रिमेक केला जात आहे. या चित्रपटात अजयच्या सोबत तब्बू दिसणार आहे.
 
6.हिट हा तेलुगू इन्व्हेस्टिगेटेड थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाच्या तेलुगूमध्ये सिक्वेलची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे त्याच्या हिंदी रिमेकचे कामही सुरू झाले आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा दिसणार आहेत. चित्रपटाचे नाव हिट राहील.
 
7.अल्लू अर्जुन-पूजा हेगडे यांच्या आला वैकुंठपुरमलो या चित्रपटात कॉमेडी, रोमान्स आणि अॅक्शन दिसले. हा चित्रपट सर्वांनाच आवडला होता. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे नाव शहजादा आहे, ज्याचे दिग्दर्शन रोहित धवन करणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
 
8.आर माधवन आणि विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका असलेला तमिळ अॅक्शन चित्रपट विक्रम वेधा. या चित्रपटाचे हिंदी व्हर्जनही याच नावाने बनवले जात आहे, ज्यामध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटातील हृतिकचा लूक समोर आला आहे.
 
9.2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या तामिळ चित्रपट सूरराई पोत्रूमध्ये सुर्या मुख्य भूमिकेत दिसली होती आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात एका व्यक्तीची कथा सांगितली आहे ज्याला स्वतःची एअरलाईन्स सुरू करायची आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमार, रश्मिका मंदान्ना आणि परेश रावल दिसणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज

Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज

सर्व पहा

नवीन

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

जेव्हा श्रीदेवी बोनी कपूरवर चिडल्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

यक्ष आणि गंधर्वांनी बांधलेले गुहा मंदिर आजही येथे आहे

ज्येष्ठ तमिळ अभिनेते दिल्ली गणेश यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments