Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमिरच्या आईचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह

aamir khans
, गुरूवार, 2 जुलै 2020 (08:43 IST)
अभिनेता अमिर खानच्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले होते. अमिरने ट्विटरद्वारे ही माहिती दिली होती. त्यानंतर त्याने आईची कोरोनाची चाचणी करून घेतली. अखेर  अमिरच्या आईचा कोरोना चाचणीचा अहवाल आला आहे. अमिरने पुन्हा एकदा ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.

अमिरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या आईची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार’ .याआधी आमिरने फेसबुकवर पोस्ट करत काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. माझ्या कर्मचाऱ्यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने क्वारंटाइन करण्यात आले असून महानगरपालिकेकडून योग्य ती उपचाराची काळजी घेतली जात आहे. कोरोना बाधितांची योग्य ती काळजी घेतल्याबद्दल मी मुंबई महानगर पालिकेचे आभार मानतो. तसेच माझी आणि उलेल्या कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली. ती निगेटीव्ह आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुशांत सिंहच्या आत्महत्येआधीच विकिपीडियावर मृत्यूची वेळ अपडेट