Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉलिवूडला मिळाली आणखी एक शर्मा

aayasha sharma
, शुक्रवार, 9 मार्च 2018 (08:08 IST)
बॉलिवूडमध्ये सततच कोणी ना कोणी नवीन सुंदर चेहरा येत असतो. त्यामध्ये काही विशेष नाही. मात्र आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने घोषणा होत असल्याने एका नवीन चेहऱ्याचे महत्व वाढले आहे. ही नवीन ऍक्‍ट्रेस म्हणजे बॉलिवूडमधील एका ऍक्‍ट्रेसचीच बहिण आहे आणि मुख्य म्हणजे हिच्या निमित्ताने बॉलिवूडला आणखी एक ‘शर्मा’मिळाली आहे. साधारण महिन्याभरापूर्वी या नव्या चेहऱ्याच्या संभाव्य बॉलिवूड एन्ट्रीबाबत सूतोवाच केल्याचे गंधर्वच्या वाचकांना आठवत असेल. ती ही आयशा शर्मा आता अधिकृतपने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सिद्ध झाली आहे. “तुम बिन’सह अनेक सिनेमांमध्ये काम केलेल्या नेहा शर्माची ती धाकटी बहिण आहे आणि आता जॉन अब्राहमची हिरोईन म्हणून दिसणार आहे.
 
बिहारमधील नेते अजित शर्मा यांची कन्या आयशा शर्मा सध्या मॉडेलिंगमध्ये व्यस्त आहे. तिला यापूर्वी वरुन धवनबरोबर “जुडवा 2’मध्ये रोल दिला जाणार अशी चर्चा जोरात सुरू होती. मात्र काही कारणामुळे हे समिकरण जुळले नाही. अलिकडेच अर्जुन कपूरच्या “नमस्ते इंग्लंड’च्या संदर्भानेही तिचे नाव पुढे आले होते. निखील अडवाणीची निर्मिती असलेल्या आणि मिलाप झवेरी डायरेक्‍शन करत असलेल्या एका ऍक्‍शन थ्रिलरमध्ये ती आता जॉन अब्राहमची हिरोईन म्हणून दिसणार आहे, हे नक्की झाले आहे. पोलिस आणि खुनी गुन्हेगारामधील संघर्षाची कथा असलेल्या या ऍक्‍शन थ्रिलरमध्ये जॉनबरोबर मनोज वाजपेयी देखील असणार आहे. या सिनेमाचे नाव अद्याप निश्‍चित झालेले नाही. मात्र सिनेमाचे शुटिंग याच आठवड्यात सुरूही झाले आहे.
 
पुढच्यावर्षी जूनच्या आसपास हा सिनेमा रिलीज होण्याची शक्‍यता आहे. आयशाने यापूर्वी काही दक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र आता ती बॉलिवूडमध्ये अधिक सक्रिय होणार आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कपूर होते. अनुष्का शर्मा, नेहा शर्मा आणि कपिल शर्मा हे “शर्मा’ही होतेच. आता आणखी एक “शर्मा’ची भर पडली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘#505’ हा मराठी लघुपटाची कान्सवारी