यावर ट्विटरने ऑफिशियल पोस्ट करून सांगितले की, आमची टीम या इशूवर काम करत आहे. समस्या सुटल्यानंतर अकाऊंट होल्डरला थेट कळवण्यात येईल. तोपर्यंत अननोन अकाऊंटवरुन येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका.त्याचबरोबर ट्विटरने सर्व अकाऊंट धारकांना सुचित केले आहे की, तुम च्या डिरेक्ट मेसेजमध्ये येणारी कोणतीही लिंक ओपन करु नका. त्या कितीही खऱ्या वाटल्या तरी. ह्याच माध्यमातून हॅकर्स अकाऊंट हॅक करतात. हा मेसेज सर्वांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन ट्विटरद्वारे करण्यात आले आहे.