Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेता दिलीप कुमार यांचे वयाच्या 98 वर्षी निधन झाले

Actor Dilip Kumar has died at the age of 98 Dilip kumar passes away
, बुधवार, 7 जुलै 2021 (08:27 IST)
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन वयाच्या 98 वर्षी झाले.दिलीप कुमार बराच काळापासून आजारी होते.श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे नुकतेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर त्याच्या मृत्यूची बातमी आली.दिलीप कुमार यांना त्यांचे चहेते आणि चित्रपटसृष्टीतील लोक सोशल मीडियावर श्रद्धांजली देत आहे.
 
एएनआयच्या वृत्तानुसार, त्यांच्यावर उपचार करणार्‍या पल्मोनॉजिस्ट  डॉ. जलील पारकर यांनीही ही बातमी दिली. दिलीप कुमार यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .दिलीप कुमार यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांची पत्नी सायरा बानो सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत अपडेट देत होती. त्याचबरोबर यापूर्वीही दिलीप कुमार यांना यावर्षी दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांतच त्यांना डिस्चार्ज करण्यात आले होते.पण यावेळी चाहत्यांनी आणि जवळच्या लोकांकडून लाखो प्रार्थना केल्यावरही दिलीप साहब निरोप घेऊन या जगातून निघून गेले.
 
 गेल्या वर्षी दिलीप कुमारने 88 वर्षाचे अस्लम खान आणि 90 वर्षीय एहसान खान हे त्यांचे दोन लहान भाऊ कोरोनामुळे गमावले होते. त्यानंतर त्यांनी आपला वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस देखील साजरा केला नाही .सायरा बानो यांनी सांगितले होते की त्यांच्या भावांच्या निधनाची बातमी त्यांना बऱ्याच काळ दिली नव्हती.
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बक्षीस मिळाला आहे.