suvichar

अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल

Webdunia
शुक्रवार, 12 एप्रिल 2024 (11:18 IST)
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केले असून साताराच्या रुग्णालयात त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया पार पडली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

मराठी, हिंदी आणि दक्षिणेच्या चित्रपटात आपला अभिनयाचा ठसा उमटवणारे सयाजी शिंदे यांची तब्बेत बिघडली आहे. त्यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना साताऱ्याच्या रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृती बाबत अपडेट दिले आहे.

त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टर म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून त्यांना अस्वस्थता जाणवत होती. त्यांनी रुटीन चेकअप म्हणून काही तपासण्या केल्या असून त्यांच्या ईसीजी मध्ये काही चेंजेस आढळले. त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल कमी होताना आढळली. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्यांच्या तब्बेतीत सुधारणा लवकर व्हावी म्हणून चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे.  
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

नवीन

83 वर्षीय अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया झाली? ICU मध्ये दाखल, बिग बींच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्त्वाची माहिती

राजस्थान रॉयल्सच्या वादाप्रकरणी इंग्लंड न्यायालयाने राज कुंद्राला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले

विजयच्या 'जना नायगन'चा नवा टीझर प्रदर्शित झाला

महाराष्ट्रातील अशी 7 ठिकाणं जिथे पावसाळ्यात जाणं म्हणजे स्वर्गाचा अनुभव

'रामायण'मध्ये हनुमानाची भूमिका साकारणार सनी देओल, म्हणाले-ही भूमिका देवाचा आशीर्वाद

पुढील लेख
Show comments