Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Anaya Soni:अभिनेत्री अनया सोनीची प्रकृती चिंताजनक, दोन्ही किडनी निकामी, उपचारासाठी पुरेसे पैसे नाही

Actress Anaya Soni's condition is critical
, रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (17:20 IST)
'मेरे साई' या टीव्ही शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनाया सोनी नुकतीच आजारी पडली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. अनाया सोनी 'मेरे साई'च्या सेटवर शूटिंग करत असताना ती अचानक बेशुद्ध पडली. अनया सोनीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि शूटिंग थांबवण्यात आले. अनया सोनी यांची प्रकृती अद्याप बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे.
 
अनन्या सोनीच्या वडिलांनी सांगितले की, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अनया सोनीची किडनी निकामी झाली आहे. तिची किडनी बदलावी लागेल. अनया सोनी सध्या डायलिसिसवर आहे. अनया सोनीच्या वडिलांनीही सांगितले की तिची आर्थिक स्थितीही चांगली नाही. अनयावर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. मुलीच्या दोन्ही किडनी बदलण्यासाठी आणि डायलिसिससाठी पैसे कुठून आणणार याची चिंता अनया सोनीच्या वडिलांना सतावत आहे.या पूर्वी तिची एक किडनी निकामी झाल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला स्वतःची किडनी दिली असून आता ती किडनी देखील निकामी झाल्यामुळे तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यापासून ती सध्या डायलेसिस वर असून तिची प्रकृती अद्याप बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. तिची आर्थिक स्थितीही चांगली नाही. अनयावर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. मुलीच्या दोन्ही किडनी बदलण्यासाठी आणि डायलिसिससाठी पैसे कुठून आणणार याची चिंता अनया सोनीच्या वडिलांना सतावत आहे
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आशा पारेख जन्मदिन : 'अनेकांनी मागणी घातली पण त्या अविवाहितच राहिल्या'