Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बालीमध्ये अभिनेत्री नुसरत भरुचाचा अपघात, रुग्णालयात दाखल

मनोरंजन
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. इंडोनेशियातील बाली बेटावर एका कामाच्या निमित्ताने गेलेल्या या अभिनेत्रीचा अपघात झाला. अपघातानंतर तिला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, नुसरत व्यावसायिक कामासाठी बालीला गेली होती आणि काम पूर्ण झाल्यावर तिने काही दिवस मुक्काम वाढवला होता. याच काळात तिचा अपघात झाला. तिला झालेल्या जखमा किती गंभीर आहेत आणि अपघात नेमका कोणत्या प्रकारचा आहे, हे अद्याप कळलेले नाही. ही बातमी मिळताच नुसरतचे चाहते आणि बॉलिवूड कलाकारांनी तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे.
 
नुसरतचे चाहते तिच्या प्रकृतीबद्दल चिंतित असतानाच, तिच्या व्यावसायिक जीवनातून एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुसरत भरुचाने बॉलिवूड अॅक्शन स्टार टायगर श्रॉफच्या आगामी ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी करार केला आहे.
नुसरत भरुचा ही बॉलिवूडमधील अशा काही मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने आपल्या मेहनतीने आणि अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. 'प्यार का पंचनामा', 'सोनू के टिटू की स्वीटी' आणि 'छोरी' यांसारख्या चित्रपटांमुळे ओळख मिळवलेली नुसरत, अलीकडेच 'उफ्फ ये सियापा' या कॉमेडी-थ्रिलरमध्ये अभिनेता सोहम शाहसोबत दिसली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करण जौहरचा शो 'Koffee with Karan' निरोप घेणार