Dharma Sangrah

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रंभा हिने अचानक बॉलिवूडला का दिला निरोप; आता कुठे आहे?

Webdunia
गुरूवार, 5 जून 2025 (08:04 IST)
Bollywood News: अभिनेत्री रंभा हिने तिच्या करिअरची सुरुवात मल्याळम चित्रपट 'सरगम' पासून केली. ९० च्या दशकात रंभा हिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला 'यलो हाऊस' हा चित्रपट तिचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट होता.
 
तसेच ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रंभा हिची कारकीर्द शिखरावर होती तेव्हा तिने अचानक बॉलिवूडला निरोप दिला. आता ती चित्रपटांपासून दूर कॅनडामध्ये आनंदी कौटुंबिक जीवन जगत आहे.
 
रंभा हिचा जन्म ५ जून १९७६ रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे झाला. तिने मल्याळम चित्रपट 'सरगम' द्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर तमिळ, तेलगू, हिंदीसह अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये तिची उपस्थिती निर्माण केली. हिंदी चित्रपटसृष्टीत तिने सलमान खानसोबत जुडवा, मिथुन चक्रवर्तीसोबत जीरम, अनिल कपूरसोबत घरवाली बहरवाली आणि गोविंदासोबत क्यूंकी मैं झूट नहीं बोलता यासारख्या चित्रपटांमधून आपली छाप पाडली.
 
२००४ मध्ये प्रदर्शित झालेला 'यलो हाऊस' हा तिचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट होता. त्यानंतर तिने हिंदी चित्रपटांपासून स्वतःला दूर केले. २०१० मध्ये तिने कॅनेडियन उद्योगपती इंद्र कुमार पद्मनाथनशी लग्न केले. लग्नानंतर ती कायमची कॅनडामध्ये स्थायिक झाली आणि चित्रपटसृष्टीला निरोप दिला. आता रंभा पत्नी आणि आईच्या भूमिकेत व्यस्त आहे. व ती ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर आहे पण समाधानी आणि आनंदी जीवन जगत आहे.
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: अभिनेत्री हिना खानने रॉकी जयस्वालशी लग्न केले

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

सर्व पहा

नवीन

ग्रीनलँडमधील टॉप १० पर्यटन स्थळे; सुंदर निसर्ग, बर्फ आणि साहसाचे एक अनोखे जग

या हिरोमुळे करण जोहर होळी साजरी करत नाही

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारांची पंतप्रधानांसह मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेकडे मदतीची हाक

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

पैसे कमवण्यासाठी कॉफी शॉपमध्ये काम करणाऱ्या श्रद्धा कपूरने १६ व्या वर्षी सलमान खानची चित्रपट ऑफर नाकारली

पुढील लेख
Show comments