Publish Date: Fri, 29 Nov 2024 (18:28 IST)
Updated Date: Fri, 29 Nov 2024 (18:36 IST)
सामंथा रुथ प्रभू यांचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सामंथाने पोस्टवर लिहिले, जोपर्यंत आपण पुन्हा भेटू, पापा. त्यासोबत त्याने हार्ट ब्रेक इमोजीही शेअर केला आहे.
सामंथा चे वडील जोसेफ प्रभू हे तेलगू-अँग्लो -इंडियन होते. सामंथाच्या जीवनात आणि संगोपनात अविभाज्य भूमिका बजावली. मात्र, त्यांना त्यांच्या कामात वडिलांची साथ मिळाली नाही.
एका मुलाखतीत सामंथा रुथ प्रभूने तिचे वडील जोसेफ यांच्याशी असलेल्या तिच्या बॉन्डबद्दल बोलले होते. आपल्या वडिलांचे कौतुक करताना,तिला तो काळ आठवला जेव्हा तिच्या वडिलांनी तिला खूप छान पद्धतीने वाढवले.
ऑक्टोबर 2021 मध्ये, सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचे लग्न मोडल्यानंतर एका वर्षांनंतर सामंथाच्या वडिलांनी सोशलमिडीयावर लग्नाचे फोटो शेअर करत लिहिले की त्यांना घटस्फोट स्वीकारण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. सामंथा प्रभू आणि चैतन्य यांचे लग्न 6-7 ऑक्टोबर 2017 रोजी लग्न झाले होते. नंतर 2021 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. आता नागा चैतन्य 'मेड इन हेवन' अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत पुन्हा लग्न करण्यास तयार आहे.
सामंथा अलीकडेच अमेझॉन प्राईम व्हिडीओ मालिका 'सिटाडेल: हनी बनी' मध्ये वरुण धवन सोबत दिसली होती.वडिलांच्या निधनाने तिला धक्का बसला आहे.