Festival Posters

अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं निधन

Webdunia
गुरूवार, 13 एप्रिल 2023 (09:44 IST)
facebook
मराठी, हिंदी चित्रपटात तसेच हिंदी नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयाचा स्वंतत्र ठसा उमटवणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर (वय ७९) यांचे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या अविवाहित होत्या.
 
गेल्या दीड वर्षापासून बावकर या पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बाणेर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
 
बावकर या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक इब्राहिम अल्काझी यांच्या तालमीत तयार झालेल्या त्या अभिनेत्री होत्या. त्यांनी दिल्ली येथील रंगभूमीवर ‘ऑथेल्लो’, गिरीश कर्नाड यांच्या “तुघलक’सह अनेक नाटकांत काम केले होते.
 
जयवंत दळवी यांच्या “संध्या छाया’ नाटकाचे “कुसुम कुमार’ या नावाने हिंदीत रुपांतर करून त्याचे दिग्दर्शनही बावकर यांनी केले होते. रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू

'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार

विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

सर्व पहा

नवीन

संजयच्या 'आखिरी सवाल' या चित्रपटाचा दमदार टीझर हनुमान जयंतीला प्रदर्शित होणार

अक्षय कुमारने 'हैवान'च्या प्रदर्शनाबद्दल मोठे अपडेट दिले

माउंट अबू पासून उदयपूर पर्यंत अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेली ही ठिकाणे भेट देण्यासाठी सर्वोत्तम

'धुरंधर २' ने ८ दिवसांत जगभरात १०८८ कोटी रुपयांची कमाई केली

मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू

पुढील लेख
Show comments