Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऐश्वर्या करणार राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा ‘फॅनी खान’

aishwarya-rai-bachchan-signs-rakeysh-omprakash-mehras-next-film-titled-fanney-khan
, बुधवार, 7 जून 2017 (11:23 IST)

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आता पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर झळकायला सज्ज झाली आहे. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी ‘फॅनी खान’ या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत काम करण्याची ऐश्वर्याची पहिलीच वेळ आहे. पण या सिनेमाविषयीची अधिक माहिती सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आळी आहे. तसंच, ऐश्वर्या या सिनेमात फॅनी खानच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार की दुसरी कोणती भूमिका साकारणार हे स्पष्ट झालेलं नाही. ‘रुस्तम’ सिनेमाची निर्मिती करणारी क्रिअर्ज एण्टरटेंन्मेट ही निर्मिती संस्था या सिनेमाची निर्मिती करणार आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेत्री ममता कुळकर्णी आणि तिचा नवरा फरार घोषित