Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजय देवगण मराठी चित्रपटात, दिसणार पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत

ajay devgan in marathi film
, सोमवार, 25 डिसेंबर 2017 (10:00 IST)

अजय देवगण लवकरच एका मराठी चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. अजयने स्वत: ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत या चित्रपटाविषयी माहिती दिली. सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव ‘आपला मानूस’ असे आहे. यामध्ये अजय पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत दिसणार आहे.

‘या चित्रपटसृष्टीत मला २५ वर्षे झाली. नवीन चित्रपट, नव्या भूमिका, नवीन कथा यांमुळे तुमच्यासोबत आपुलकीचं नातं निर्माण झालं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासोबतचं माझं नातं जन्मापासूनचे आहे. मराठी भाषेसाठी नेहमीच आदर होता, पण काजोलशी लग्न केल्यानंतर मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करू लागलो. याच संस्कृतीमुळे मराठी चित्रपटांची एक वेगळीच ओळख आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग होण्यासाठी मी ‘आपला मानूस’ तुमच्या भेटीला आणतोय,’ असे अजयने व्हिडिओमध्ये म्हटले. या चित्रपटात नाना पाटेकर, सुमीत राघवन, इरावती हर्षे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शत होणार आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'प्रभो शिवाजी राजा' चित्रपटातील शिवरायांचा जयघोष करणारे गाणे प्रदर्शित