Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हाऊस अरेस्ट वादानंतर अजाज खानवर शारीरिक शोषणाचा आरोप, तक्रार दाखल

Webdunia
सोमवार, 5 मे 2025 (09:15 IST)
अभिनेता एजाज खानविरुद्ध रविवारी, 4 मे रोजी शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने एजाजवर शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, महिलेने आरोप केला आहे की, चित्रपट उद्योगात प्रवेश देण्याच्या बहाण्याने अभिनेत्याने तिचे शारीरिक शोषण केले.
ALSO READ: गायक सोनू निगम विरोधात एफआयआर दाखल
चारकोप पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एका 30 वर्षीय महिलेने अलिकडेच तक्रार दाखल केली होती की एजाज खानने तिला चित्रपटात भूमिका मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, तिला धर्मांतर करून लग्न करण्याचे आश्वासन देऊन, त्याने अनेक ठिकाणी तिचे शारीरिक शोषण केले. अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेत्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या बलात्काराशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.
ALSO READ: अभिनेता अनिल कपूर यांच्या आई निर्मल कपूर यांचे निधन
एजाज 'हाऊस अरेस्ट' या रिअॅलिटी शोमधील अश्लील कंटेंटमुळे आधीच वादात आहे. शोमधील आक्षेपार्ह टास्क आणि डायलॉग्समुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली, त्यानंतर शो आणि एजाजला खूप ट्रोल केले जात आहे. उल्लू अॅपच्या 'हाऊस अरेस्ट' या वेब शोमध्ये अश्लील सामग्री दाखवल्याबद्दल एजाज खानसह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Edited By - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच ब्रेकअप

बाबू भैया चित्रपट हेरा फेरी ३ मधून बाहेर, अभनेता सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया

‘वॉर 2’ चा टीझर प्रदर्शित; ऋतिक रोशन आणि एनटीआर च्या टक्करने वाढवली उत्सुकता!

अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

सर्व पहा

नवीन

Shani Temples चमत्कारी सहा मंदिर जिथे शनिदेव प्रत्यक्ष उपस्थित असतात

Funny Ukhane नवीन पिढीचे विनोदी उखाणे

बॉलिवूडही कोरोनाच्या विळख्यात, अभिनेत्रीच्या पॉझिटिव्ह रिपोर्टनंतर तिच्या आईलाही झाला संसर्ग

पंकज त्रिपाठी 'बाबू भैया'च्या भूमिकेत दिसतील का? अभिनेत्याने स्वतः सांगितले

अभिनेत्री अथिया शेट्टीने बॉलिवूडला निरोप दिला

पुढील लेख