Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार अक्षयकुमार

akshay kumar
Webdunia
सोमवार, 25 जून 2018 (11:16 IST)
ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट आणि बायोपिकचा ट्रेण्ड सध्या बॉलिवूडध्ये सुरू असून प्रेरणादायी सत्यकथा आणि इतिहासातील काही लक्षवेधी व्यक्तिरेखा या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न असतो. प्रेक्षकांनादेखील असे चित्रपट आवडत असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे पानिपत- द ग्रेट बेट्रेयल आणि मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांची चर्चा सुरू असतानाच आता आणखी एकाची भर यात पडणार आहे. लवकरच बाराव्या शतकातील राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अक्षयकुमार यामध्ये पृथ्वीराज यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती 'यशराज फिल्म्स' बॅनरअंतर्गत होणार असून याचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत. याबाबत डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार चित्रपटाच्या कथेविषयी आदित्य चोप्रा आणि चंद्रप्रकाश यांच्यातचर्चा झाली असून पटकथेवर एक रिसर्च टीम काम करणार आहे. चंद्रप्रकाश यांच्या मनात पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेसाठी सुरुवातीपासूनच अक्षयचा विचार होता. अक्षयकडूनही त्यासाठी अखेर होकार मिळाल्याचे वृत्त आहे. पृथ्वीराज यांच्या कारकिर्दीसोबतच संयोगिता आणि त्यांची प्रेम कहाणीसुद्धा या चित्रपटात अधोरेखित करण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेते अमिताभ यांचे काम थांबणार! ब्लॉगमध्ये लिहिले की शरीर विश्रांती मागत आहे

Miss world 2025: थायलंडची ओपल सुचाता बनली मिस वर्ल्ड 2025

करण जोहरच्या गेम शो 'द ट्रेटर्स'चा ट्रेलर प्रदर्शित, हे 20 सेलिब्रिटी असणार

बसमधून प्रवास करताना चित्रपट निर्मात्याचे हृदयविकाराचा झटका येऊन निधन

अभिनेता कमल हासनचा फोटो जाळणे तरुणांना महागात पडले,गुन्हा दाखल

सर्व पहा

नवीन

राज ठाकरेंसोबतच्या अफेअरच्या बातम्यांवर सोनाली बेंद्रेने मौन सोडले, म्हणाली-खरोखरच .....

या पॉपगायिका बद्दल बादशाहने केली वादग्रस्त वक्तव्य,नेटकऱ्यांने ट्रोल केले

मथुरा जवळील काही रोमँटिक ठिकाणे नक्कीच एक्सप्लोर करू शकता

चित्रपटगृहानंतर, भूल चुक माफ ओटीटीमध्ये धमाल करेल

14 तासांच्या स्टेज 2 लिव्हर कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्कर आयसीयूमधून बाहेर, पती शोएब ने दिले अपडेट

पुढील लेख
Show comments