Festival Posters

अक्षय कुमार बनणार नरेंद्र मोदी!

Webdunia
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर चित्रीत होत असलेल्या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरुवातीला नरेंद्र मोदींच्या जीवनपटातील मोदींच्या भूमिकेसाठी अभिनेता परेश रावल आणि अभिनेते अनुपम खेर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यांचं नाव मागे पडत अक्षय कुमारनं नाव समोर आलं आहे.
 
रिपोर्टनुसार, नरेंद्र मोदींच्या जीवनावर चित्रपट बनवणा-या निर्मात्यानं मोदींची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारला पहिली पसंती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदींच्या जीवनावरील चित्रपटावर अक्षय कुमारनं भूमिका साकारल्यास हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकून घालेल. भाजपा नेते आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हांचीही याला सहमती असल्याची चर्चा आहे.
 
ते म्हणाले, अक्षय कुमार इंडियाचे मिस्टर क्लीन अभिनेता आहेत. त्यांची प्रतिमा ही भारताच्या नव्या प्रतिमेसोबत शोभून दिसेल. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विट करत अक्षय कुमारचा चित्रपट टॉयलटः एक प्रेम कथा करमुक्त केला पाहिजे, अशी मागणी केली होती.  तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारहून अधिक कोणीच चांगलं असू शकत नाही. अभिनेता अक्षय कुमार याची प्रतिमा स्वच्छ आणि आदर्शवादी आहे. टॉयलट: एक प्रेम कथा आणि पद्यन हे चित्रपट सामाजिक सुधारणेच्या दृष्टिकोनावर आधारित आहेत. अक्षय कुमार यानंही पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं शून्यातून विश्व उभं केलं आहे. त्यामुळे अक्षय कुमारलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेसाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

सर्व पहा

नवीन

राज-डीकेच्या सुपरहिरो चित्रपटात सलमान खानसोबत समंथा रूथ प्रभू?

Sheetala Saptami भारतातील प्रसिद्ध शीतला माता मंदिर

आलिया भट्टचा अ‍ॅक्शन चित्रपट 'अल्फा' प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर, या तारखेला प्रदर्शित होणार

ऑस्कर विजेता पटकथा लेखक जेरेमी लार्नर यांचे ८८ व्या वर्षी निधन

दक्षिणेकडून बॉलिवूडपर्यंत एकामागून एक हिट चित्रपट, रश्मिका मंदाना राष्ट्रीय क्रशपासून सुपरस्टार बनली

पुढील लेख
Show comments