Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आलिया भट्टचा ‘सडक २’होणार डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

Webdunia
मंगळवार, 30 जून 2020 (08:36 IST)
दिग्दर्शक महेश भट्ट यांचा ‘सडक’हा बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट आहे. या हिट चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहते आनंदी होते. ‘सडक २’या चित्रपटाच्या निमित्ताने महेश भट्ट तब्बल २० वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार आहेत.
 
तसेच या चित्रपटाची निर्मिती मुकेश भट्ट यांनी केली आहे. आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार (Sadak2 Release on OTT Platform)असल्याचे समोर आले आहे.
 
मुकेश भट्ट यांनी नुकतीच पीटीआयला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सडक २ डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. ‘करोनाचा संसर्ग होत असलेल्यांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 
 
अशा परिस्थितीमध्ये चित्रपटगृह उघणार असे तुम्हाला वाटते का? आणि जरी सुरु झाली आणि सडक २ प्रदर्शित केला तर प्रेक्षक तो पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जातील? प्रत्येकाला आपल्या कुटुंबीयांची काळजी आहे’असे त्यांनी म्हटले.
 
‘सध्याच्या परिस्थितीने मला सडक २ डिजिडट प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास भाग पाडले (Sadak2 Release on OTT Platform) आहे. हा एकच पर्याय आहे माझ्याकडे’असे मुकेश भट्ट यांनी पुढे म्हटले आहे. 
 
‘सडक’चित्रपटात अभिनेत्री पूजा भट्ट मुख्य भूमिकेत होती आणि आता ‘सडक’च्या सिक्वेलमध्ये देखील पूजा महत्वाची भूमिका साकारणार आहे. पूजा भट्टसह आलिया देखील चित्रपटात झळकणार आहे. तसेच त्यावेळी चित्रपटात संजय दत्तची भूमिका ३२ वर्षांच्या व्यक्तीची होती आणि आता सडकच्या सिक्वेलमध्ये संजय दत्त ५४ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया पहिल्यांदाच वडीलांसोबत काम करणार आहे. 
 
यापूर्वी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुरानाचा गुलाबो सिताबो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. तसेच लवकरच अभिनेत्री विद्या बालनचा शकुंतला देवी, जान्हवी कपूरचा गुंजन सक्सेना, सुशांत सिंह राजपूतचा दिल बेचारा हा चित्रपट देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

एफआयआरनंतर सोनू निगमने दिले स्पष्टीकरण, व्हिडिओ केले शेअर

कंगना राणौत दिल्लीतील सरकारी निवासस्थानी स्थलांतरित

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आल्यावर अभिनेता सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली

या घटनेमुळे संपूर्ण देश एक झाला आहे', पहलगाम हल्ल्यावर नवाजुद्दीनने व्यक्त केले दुःख

Pahalgam terror attack नंतर अभिनेता सलमान खानचा मोठा निर्णय

सर्व पहा

नवीन

हाऊस अरेस्ट वादानंतर अजाज खानवर शारीरिक शोषणाचा आरोप, तक्रार दाखल

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर Omkareshwar Jyotirlinga

एफआयआरनंतर सोनू निगमने दिले स्पष्टीकरण, व्हिडिओ केले शेअर

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

गायक सोनू निगम विरोधात एफआयआर दाखल

पुढील लेख