Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली

Amitabh Bachchan
, मंगळवार, 13 मार्च 2018 (12:48 IST)
बॉलीवूडचे महानायक बिग बी सध्या आपले येणारे चित्रपट 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.  जोधपुरमध्ये चालत असलेल्या शूटिंग दरम्यान अमिताभ यांना प्रकृती योग्य वाटत नव्हती. या गोष्टीची माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगवर दिली आहे. अमिताभ यांनी हा ब्लॉग पहाटे 5 वाजता लिहिला आहे. त्यांनी आपल्या  ब्लॉगमध्ये ही माहिती देखील दिली आहे की त्यांची डॉक्टर्स टीम मुंबईहून जोधपुर येणार असून त्यांचा चेकअप करेल. बिग बी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की डॉक्टर्स माझे चेकअप करून परत आधीसारखे मला फिट करतील. मी आराम करत आपल्या आरोग्याबद्दल तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. अमिताभ यांच्या चेकअपसाठी मुंबईहून डॉक्टर्सची टीम रवाना झाली आहे.  
Amitabh Bachchan
सांगायचे म्हणजे अमिताभ सध्या त्यांचे येणारे चित्रपट 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान'च्या शूटिंगसाठी जोधपुर येथे गेले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हनीमून सोडून पळून आला होता अजय देवगण