बॉलीवूड अॅक्ट्रेस आणि सपा खासदार जया बच्चन यांनी संसदमध्ये बॉलीवूड-ड्रग्स प्रकरणावर दिलेल्या वक्तव्यावर पूर्ण बच्चन कुटुंबाला ट्रोल केलं जात आहे. या दरम्यान सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे ज्यात ते एकासोबत हात मिळवत असताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत लोक दावा करत आहे की बिग बींसोबत दिसत असलेली व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आहे.
काय होतंय व्हायरल-
एका फेसबुक यूजरने फोटो शेअर करत लिहिले की- ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, पर मैं आपका गुलाम हूँ..! दाऊद इब्राहिम आणि अमिताभ बच्चन यांचा जुना फोटो आता रिलीज झाला आहे म्हणूनच जया बच्चन बॉलीवूड ड्रग्स कनेक्शनवर या प्रकारे वक्तव्य करत आहे.! Shame on Amitabh Bachhan!’ हा फोटो ट्विटरवर देखील या प्रकाराचे दावा करताना व्हायरल होत आहे.
काय आहे सत्य-
व्हायरल फोटोला रिव्हर्स सर्च केल्यावर आम्हाला ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ ची 25 मार्च 2010 ची एक रिपोर्ट सापडली, ज्यात हा फोटो दिसून येत आहे. या फोटोसह कॅप्शन आहे की राजीव गांधी सी लिंक च्या कमिशनिंग सेरेमनी मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत अशोक चव्हाण. हा फोटो पीटीआय न्यूज एजेंसीचा असल्याचे सांगितले गेले आहे.
वेबदुनियाला व्हायरल दावा खोटा असल्याचे तपासणीत आढळले. फोटोत अमिताभ बच्चन हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत नसून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत आहे.