Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाहुबली सोबत नव्हे तर भारतीय क्रिकेटपटूशी लग्न करणार अनुष्का शेट्टी

Anushka Shetty
, सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (12:46 IST)
सुपरहिट सिनेमा बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिचं नाव सुरुवातीला बाहुबलीच्या को स्टार प्रभास सोबत जोडण्यात आलं होतं. तेव्हा कॉफी विद करण या शोमध्ये प्रभासने असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले होते. 
 
पण मीडिया रिपोर्टनुसार आता बाहुबलीची देवसेना म्हणजेच अनुष्का एका नावाजलेल्या भारतीय क्रिकेटपटूला डेट करत आहे. एवढंच नाही तर दोघं लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे हा क्रिकेटपटू दक्षिणेतील नसून उत्तरेकडील असल्याचं म्हटलं जात आहे. आतापर्यंत त्याच्या नावाचा खुलासा झाला नसला तरी लवकरच हे अफेयर लग्नावर येऊन थांबणार अशी माहिती दिली जात आहे.
 
सध्या अनुष्का तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती लवकरच निशब्धम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत आर. माधवन दिसणार आहे. सिनेमात अनुष्काने एका मूक कलाकाराची भूमिका साकारली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Oscar 2020 LIVE: वाल्किन फिनिक्सला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, दक्षिण कोरियन चित्रपटाच्या 'पॅरासाइट' ने तीन पुरस्कार जिंकले.