Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशात खाऊन पाकिस्तानचं कौतुक करता”, हिंदुस्तानी भाऊ भडकला

Appreciating Pakistan by eating in the country ”
, मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (08:39 IST)
भारत-पाकिस्तान सामन्यानंतर पाकिस्तानच्या विजयावर आनंद साजरा करणाऱ्यांवर सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला हिंदुस्तानी भाऊ चांगलाच भडकला आहे. भारतीय संघाच्या पराभवाचा आनंद साजरा करत आणि पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात खार पोलिस स्थानकात हिंदुस्तानी भाऊने गुन्हा दाखल केला आहे.
 
T20 वर्ल्ड २०२१ भारत-पाकिस्तान सामना झाला, दरम्यान भारताचा पराभव झाल्यानंतर काहींनी भारताच्या पराभवावर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. अशीच एक घटना मालवणीमधील हसन कोटी या व्यक्तीने एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यामध्ये त्यांनी भारतीय क्रिक्रेटर्सवर टीका केली होती. दरम्यान पाकिस्तानला पाठिंबा असून मुंबई पोलीस आपल्याला काहीही करू शकत नाही असं तो म्हणाला, या व्यक्तीविरोधात हिंदुस्तानी भाऊने पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला आहे. आणि माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितल कि “हा देशात खाऊन जर पाकिस्तानचं कौतुक करत असाल तर पाकिस्तानमध्ये जा, या देशात तुमचं काय काम आहे. ही लोकं पाकिस्तानचा विजय झाला म्हणून खूश झाली, नसून यांना भारताच्या पराजयाचा जास्त आनंद झाला आहे. अनेक ठिकाणी या लोकांनी फटाके फोडले, मिठाई वाटली. या लोकांना वेळेवर उत्तर देणं गरजेचं आहे.” सर्वांनी एकत्र येवून यांच्यावर कारवाही कारण गरजेचे आहे असं त्यांनी माध्यमांशी म्हटल आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ratlam Mahalaxmi Temple: या मंदिरातची आहे एक विचित्र प्रथा, भाविक गोठडीत भरून आणतात सोने-चांदी