Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आर्यन खानच्या जामीन प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत स्थगित

Webdunia
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (18:42 IST)
आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत ( 27ऑक्टोबर) स्थगित करण्यात आली आहे.
आर्यन खानचे प्रतिनिधित्व प्रसिद्ध विधज्ञ आणि माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी करत आहेत.
रोहतगी म्हणाले, 'आर्यन कॅलिफोर्नियतात शिकत होता 2020 ला भारतात आला. त्याला पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. अरबाजलाही बोलावण्यात आलं होतं. दोघही एकत्र पोहोचले.
'बहुदा NCB ला क्रूजवर लोक ड्रग्ज घेणार असल्याची माहिती होती. त्यामुळे ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,' असं रोहतगी म्हणाले.
याआधी, मुंबईच्या एका विशेष एनसीबी कोर्टानं आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
वृत्तसंस्था ANI नुसार, आर्यन खान याच्यासहित अरबाज मर्चंट आणि इतर 8 आरोपींचीही कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
याचा अर्थ उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास या सगळ्यांना 30 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे.
दरम्यान, मुंबईच्या उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन याचिकेवर 26 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
याआधी ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये अटकेत असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी गुरूवारी सकाळी शाहरूख खानने भेट घेतली तर त्याच वेळी एनसीबीचे पथक शाहरूखचे निवासस्थान 'मन्नत' या ठिकाणी चौकशीसाठी दाखल झालं.
आर्यनला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शाहरुखने मुलाची भेट घेतली. त्याच दिवशी एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून शाहरुख खानच्या घरी तपास करण्यात आला.
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, "आर्यन खान प्रकरणाच्यासंबंधी तपास करण्यासाठी एनसीबी अधिकारी शाहरुख खानच्या घरी गेले होते. हा कुठल्याही प्रकारचा छापा नव्हता." असंही त्यांनी स्पष्ट केलं.
जेलमध्ये कोरोनासंसर्ग पसरण्याच्या भीतीमुळे आर्थररोड जेल प्रशासनाने वकील आणि कुटुंबीयांना कैद्यांची भेट/मुलाखत बंद केली होती.
कोरोनासंसर्ग नियंत्रणात असल्याने 21 ऑक्टोबरपासून जेल प्रशासनाने कोरोना नियम पाळत कैद्यांना भेटण्यासाठी परवानगी पुन्हा सुरू केलीये.
मुलाला भेटण्यासाठी शाहरूख पोहोचला जेलमध्ये
गुरूवारी सकाळी 9 वाजता अभिनेता शाहरुख खान मुंबईच्या आर्थररोड जेलमध्ये पोहोचला.
ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला शाहरुखचा मुलगा आर्यन खानला आर्थररोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलंय.
पोलिसांच्या बंदोबस्ताता शाहरुख मुलाला भेटण्यासाठी जेलमघ्ये दाखल झाला.
शाहरुख आर्यनला भेटण्यासाठी आज कसा पोहोचला?
कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका पहाता आर्थररोड जेल प्रशासनाने वकील आणि कैद्यांच्या कुटुंबीयांना कैद्यांना जेलमध्ये भेटण्यावर बंदी घातली होती.
त्यामुळे आर्थररोड जेलमध्ये कैदेत असलेल्या कैद्यांची भेट शक्य नव्हती.
महाराष्ट्रात सद्यस्थितीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. त्यामुळे आर्थररोड जेल प्रशासनाने वकील आणि नातेवाईकांना कैद्यांना भेटण्याची परवानगी दिलीये.
आर्थर रोड जेल प्रशासनाने याबाबतची नोटीसही जेलबाहेर लावली आहे.
या नोटीसमध्ये असं लिहिण्यात आलंय, "बंदी नातेवाईक आणि वकील प्रत्यक्ष भेट/मुलाखत कोरोनाबाबात सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करून 21 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येत आहेत."
"एकावेळी बंद्याचे जास्तीत जास्त दोन नातेवाईकांनाच भेट घेता येईल."
शाहरुख-आर्यन समोर आल्यावर काय घडलं?
मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात शाहरूख खान आणि आर्यनची 15-20 मिनिटं भेट झाली.
सुरुवातीला टोकन देऊन शाहरुख खानला तुरुंगात प्रवेश देण्यात आला.
दोघांच्या भेटीदरम्यान 4 सुरक्षारक्षक त्याठिकाणी उपस्थित होते.
शाहरुख खान आणि आर्यन खान यांच्यात ग्लास पार्टिशन लावण्यात आलेलं होतं.
तुरुंग प्रशासनाकडून मिळालेला भेटीचा वेळ संपल्यानंतर शाहरुख खान स्वतःहून निघून गेला, अशी माहिती मिळाली आहे.
आर्यनच्या अटकेवेळी शाहरूख परदेशी होता
2 ऑक्टोबरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खानला ड्रग्जप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खान त्यावेळी दुबईत होता.
त्यामुळे त्याला आर्यन खानची भेट घेता आली नव्हती
आर्यन खानचे वकील त्याला NCB कार्यालयात येऊन भेटले होते.
आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरूखने NCB च्या कार्यालयात फोनवर आर्यनशी चर्चा केल्याची माहिती समोर आली होती.
आर्यन खानचा जामीन का फेटाळण्यात आला?
न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील यांनी आर्यन खानची जामीन याचिका का फेटाळण्यात आली याबाबत आपल्या आदेशात खालील मुद्दे नमूद केले आहेत -
1. आरोपी नंबर 1 (आर्यन खान ) आणि आरोपी नंबर 2 ( अरबाज मर्चंट) मित्र आहेत. दोघांनी आपल्या जबाबात जवळ ड्रग्ज असल्याचं आणि सेवन केल्याचं मान्य केलंय. त्यामुळे आर्यन खानला अरबाजकडे ड्रग्ज असल्याची माहिती होती.
2. कोर्टाला दाखवण्यात आलेल्या Whats App चॅटवरून दिसून येतं की, आर्यन खानचे (आरोपी नंबर 1) अज्ञात लोकांसोबत ड्रग्जबाबत चॅट आहेत. जास्त प्रमाणात ड्रग्ज आणि हार्ड ड्रग्जबद्दल बोलण्यात आलंय. प्राथमिक पुराव्यांनुसार आर्यन खानचे ड्रग्जशी संबंधित लोकांसोबत संबंध होते.
3. What's App चॅट मधून दिसून येतं की आर्यन खानचे (आरोपी नंबर 1) ड्रग्ज सप्लायर्स आणि पेडलर्ससोबत संबंध आहेत
4. आरोपींनी संगनमताने हा गुन्हा केला.
5. आरोपी ड्रग्जशी संबंधित मोठ्या नेटवर्कचे भाग आहेत
6. आर्यन खानची जामीनावर मुक्तता केली तर तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो या सरकारी पक्षाच्या युक्तिवादाशी सहमत आहे.
7. What's App चॅटवरून आरोपी नंबर 1 (आर्यन खान) ड्रग्ज कारवायांशी संबंधित आहे असं दिसून येतं. जामीनावर असताना पुन्हा असा गुन्हा करणार नाही असं म्हणता येणार नाही
त्यामुळे या आरोपांना जामीन देणं योग्य ठरणार नाही.
पुढील सुनावणी 26 ऑक्टोबर रोजी
दरम्यान, आर्यन खान प्रकरणातील जामीन याचिकेवरील आजची सुनावणी स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता मंगळवार, 26 ऑक्टोबर रोजी होईल, अशी माहिती मिळाली आहे.
न्यायमूर्ती N W सांबरे यांच्यासमोर आर्यनची जामीन याचिका दाखल आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

पाकिस्तान की नरक निवडण्याचा पर्यायावर जावेद अख्तर यांनी कोणता पर्याय निवडतील सांगितले

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची गळफास लावून आत्महत्या

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

पुढील लेख