Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येत आहेत मुन्ना-सर्किट

Webdunia
शनिवार, 12 जानेवारी 2019 (15:42 IST)
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटांना मिळलेल्या यशानंतर आता त्याचा तिसरा भाग येणार आहे. यासंदर्भातील माहिती अभिनेता अर्शद वारसीने दिली आहे. 'मुन्नाभाई 3'च्या शूटिंगला या वर्षाच्या मध्यापर्यंत किंवा अखेरपर्यंत सुरुवात होणार असल्याचे त्याने सांगितले. 2003 मध्ये राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 'लगे रहो मुन्नाभाई' हा सिक्वल त्याच्या तीन वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला. 
 
जवळपास 10 वर्षांहून अधिकचा काळ 'मु न्नाभाई 3'साठी लागला. पहिल्या दोन चित्रपटांप्रमाणेच संजय दत्त मुन्नाभाई तर अर्शद सर्किटच्या भूमिकेत असेल. चित्रपट झाल्यानंतर त्या भूमिकेला मी  विसरून जातो. त्यामुळे 'लगे रहो मुन्नाभाई'तील सर्किटसाठीही मला फार वेळ लागला. पुन्हा पुन्हा पहिल्या चित्रपटातील दृश्ये बघून मी ती भूमिका साकारली होती. आता त्याहून जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. चित्रपटाच्या पटकथेवर सध्या काम सुरू असल्यामुळे जून किंवा वर्षाअखेरीस शूटिंगला सुरुवात होईल, असे अर्शदने सांगितल्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना मुन्नाभाई आणि सर्किटची धमाल पाहायला मिळणार हे नक्की.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

नवीन

रणबीर कपूरचा 'रामायणम्' प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला, रामलीला महासंघाचा इशारा; आधी आम्हाला चित्रपट दाखवा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

Meghalaya Tourism ईशान्य भारतातील निसर्गरम्य राज्य! मेघालय

कंगना रणौत हृतिक रोशनवर संतापली, पार्टनरला लाजिरवाणे करणे थांबवा म्हणाली

अभिनेते व्हिन्सेंट पास्टोर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments