मार्वलचा बहुचर्चित असा 'एवेंजर्स एंडगेम'सिनेमाचा जोरदार धुमाकूळ बॉक्स ऑफिसवर कायम आहे. हा चित्रपट रिलीज होऊन फक्त ४ दिवस झाले आहेत. तरीही चित्रपटगृहे प्रेक्षकांनी जबरदस्त भरली आहेत. या चार दिवसात चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे. हा चित्रपट २६ एप्रिल रोजी भारतात रिलीज झाला होता. तर त्या आगोदर तो चीनमध्ये २३ एप्रिलला रिलीज झाला होता. ‘एवेंजर्स’च्या निर्मात्यांना चीनमध्ये चित्रपट रिलीज करण्याचा फायदा दिसून येतौय, ‘एवेंजर्स: एंडगेम’ने चीनमध्ये, वर्ल्डवाईड अशी आतापर्यंत ८३८१ कोटी रुपये (१.२ बिलियन डॉलर) हून अधिक कमाई केले. यामध्ये चीनी बॉक्स ऑफिसचे योगदान जवळपास २२०० कोटी रुपयांचे (३३० मिलियन डॉलर) इतके आहे. पहिल्याच आठवड्यात इतक्या कोटींचा गल्ला जमवून या चित्रपटाने मोठा रेकॉर्ड केला. तर ‘एवेंजर्स’ सीरीजच्या मागील चित्रपटाने ‘इनफिनिटी वॉर’ला इतका प्रतिसाद नव्हता, जितका या चित्रपटाला मिळाला आहे. भारतात तीन १५७.२० कोटी रु.चा बिझनेस झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात हा गल्ला अजून वाढण्याची दाट शक्यता असून सुट्टी आणि चांगला चित्रपट यामुळे फायदा होणार असे दिसते आहे.