Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फक्त ऐश्वर्या-अभिषेकच नाही तर पूर्ण बच्चन फॅमिली दिसेल या चित्रपटात

bachhan family in one film
बॉलीवूडचे ख्यात फिल्ममेकर अनुराग कश्यप द्वारा अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चनाला घेऊन चित्रपट बनवण्याची चर्चा जोरावर आहे. आता वृत्त असे आहे की अनुराग या चित्रपटात फक्त ऐश्वर्या-अभिषेक नाही तर पूर्ण बच्चन परिवाराला घेऊन तयार करत आहे. चित्रपटाचे नाव आहे 'गुलाब जामुन'. या चित्रपटाचे निदेर्शन त्याचे सहायक करणार आहे.  
 
काही दिवसांगअगोदर बच्चन परिवाराला चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवण्यात आली होती. ती अमिताभ, अभिषेक आणि ऐश्वर्याला लक्षात ठेवून लिहिण्यात आली होती. नंतर जयाला देखील या चित्रपटात जोडण्यात आले. या प्रकारे संपूर्ण परिवार पहिल्यांदाच कुठल्या चित्रपटात दिसणार आहे.  
bachhan family in one film
या अगोदर अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या रामगोपाल वर्माच्या 'सरकार राज'मध्ये एकत्र आले होते. त्याशिवाय हे तिघ 'बंटी और बबली'मध्ये एका गाण्यात सोबत दिसले होते. अमिताभ, अभिषेकचे करियर परत एकदा बनवण्यात लागले आहे. अभिषेकने देखील हे निश्चित केले आहे की तो एखादा जानदार रोलच करेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नळदूर्ग किल्ला - एक पर्यटन स्थळ