बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहानाने 'द आर्चीज' या चित्रपटातून अभिनयाच्या जगात प्रवेश केला आहे. आता शाहरुखचा मुलगा आर्यन खानही बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाला आहे. पण आर्यन त्याच्या वडिलांप्रमाणे अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल.
आर्यन खान 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधून पदार्पण करत आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' या शोची पहिली झलकही समोर आली आहे. आर्यनची ही मालिका नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. नेटफ्लिक्सने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शोचा व्हिडिओ शेअर केला आहे.
१ मिनिट २६ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये आर्यन खान प्रथम दिसतो. तो त्याच्या शोबद्दल सांगतो. त्यानंतर लक्ष्य लालवानी आणि आन्या सिंग दिसतात. दोघांची प्रेमकहाणी दाखवली आहे. व्हिडिओमध्ये अॅक्शन आणि ड्रामा एखाद्या बॉलिवूड चित्रपटासारखा दिसतो.
व्हिडिओमध्ये आर्यन खान म्हणतो, आतापर्यंत तुम्ही बॉलिवूडला खूप प्रेम आणि वॉर दिले आहे. माझ्या शोमध्येही तुम्हाला खूप प्रेम आणि थोडे वॉर पहायला मिळेल, कारण ही बॉलीवूडची कहाणी आहे. पिक्चर तर कित्ये वर्षांपासून प्रलंबित आहे, पण शो आता सुरू होईल.
नेटफ्लिक्स इंडियाची ओरिजनल सीरीज 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'ची झलक शेअर करताना लिहिले आहे, Zyaada hogaya? Aadat daal lo… द बॅड्स ऑफ बॉलिवूड प्रिव्ह्यू २० ऑगस्ट रोजी येत आहे.
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चे दिग्दर्शनच केले नाही तर त्याचे लेखनही केले आहे. या मालिकेत शाहरुख खान एक छोटीशी भूमिकाही साकारणार आहे. ही मालिका गौरी खानने रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार केली आहे.