Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात चोरी

Bollywood actress Sonam Kapoor's house burglarized
, शनिवार, 9 एप्रिल 2022 (13:22 IST)
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरातून करोडोंची चोरी झाली आहे. याबाबत सोनमच्या आजीसासूने तुघलक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरट्यांनी त्यांच्या  घरातून 1.41 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून पळ काढला. पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवल्यानंतर  पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.महत्वाचे म्हणजे की ज्या घरात चोरी झाली, त्या घरात घरात  25 नोकर, 9  केअर टेकर, ड्रायव्हर आणि माळी आणि इतर कर्मचारी काम करतात. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.  
 
हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने पोलिसांनी दडपले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बाब फेब्रुवारी महिन्याची आहे. क्राइम टीम व्यतिरिक्त एफएसएल टीम सर्व पुरावे  गोळा करण्यात गुंतलेली आहे. मात्र अद्याप एकही आरोपी सापडलेला नाही. सरला आहुजाचे व्यवस्थापक रितेश गौरा यांनी 23 फेब्रुवारी रोजी तुघलक रोड पोलिस ठाण्यात  चोरीचा एफआयआर दाखल केला होता. एफआयआरनुसार, त्याच्या घरातून 1.40 कोटी रुपयांच्या दागिन्यांसह 1लाख रुपयांची रोकड गायब आहे.  
 
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस गेल्या वर्षभरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.  
Bollywood actress Sonam Kapoor's house burglarized
सोनम कपूर 6 महिन्यांची गरोदर आहे
विशेष म्हणजे सोनम कपूर सध्या मुंबईत  असून ती 6 महिन्यांची गरोदर आहे. सोनम सध्या पती आनंद आहुजासोबत मुंबईत आहे.  दोघेही आपल्या मुलाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, सोनम या वर्षी ऑगस्टमध्ये मुलाला जन्म देणार आहे. सोनमने तिचे मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करून तिच्या गरोदरपणाची बातमी दिली.    

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Samrenu Title Song- 'समरेणू' चे प्रेमात पाडणारे शीर्षकगीत प्रदर्शित....