Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉलिवूड बातमी ,सलमान खान च्या टायगर 3 चा सेट उध्वस्त ,कोट्यवधींचा फटका

Bollywood news
, बुधवार, 9 जून 2021 (17:03 IST)
मुंबई :अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनित टायगर 3 या चित्रपटाला मोठा फटका बसला असून कोट्यवधींचा तोटा झाल्याचे वृत्त मिळाले आहे. या चित्रपटाच्या निर्मिती साठी सर्वानी मेहनत घेतली असून ती व्यर्थ गेल्याचे समजले आहे.लॉक डाऊन पूर्वी या चित्रपटाचा सेट उभारण्यात आला होता पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण बंद करण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्यांदा देखील दुसऱ्या ठिकाणी सेट उभारण्यात आला या सेट ला उभारण्यासाठी  250 -300 कामगार  लागले होते. लॉक डाऊन अद्याप आहे आणि त्याच वेळी पाऊसाने जोर धरल्याने पावसामुळे टायगर 3 चित्रपटाचे सेट उध्वस्त झाले आहे.त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.या चित्रपटात सलमान आणि कतरीना हे मुख्य भूमिकेत तर इम्रान हाशमी खलनायकाच्या भूमिकेत असल्याचे सांगत आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनिल कपूरने इंस्टाग्रामवरून सोनमला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा