Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pahalgam terror attack नंतर अभिनेता सलमान खानचा मोठा निर्णय

Webdunia
सोमवार, 28 एप्रिल 2025 (18:00 IST)
Bollywood News: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. त्याच वेळी, दहशतवादी घटनेनंतर सेलिब्रिटी देखील खूप दुःखी आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांचे आगामी कार्यक्रम आणि शो रद्द केले आहे.
ALSO READ: अनुपम खेर दिग्दर्शित 'तन्वी द ग्रेट' चित्रपटाची नायिकाची काजोल ओळख करून देणार
आता या घटनेने दुःखी होऊन बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननेही एक मोठा निर्णय घेतला आहे. सलमान खानने मे महिन्यात होणारा त्याचा युके दौरा पुढे ढकलला आहे. सलमानने एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. या दौऱ्यात त्याच्यासोबत अनेक सेलिब्रिटी परफॉर्म करणार होते. तसेच सलमान खानने लिहिले की, काश्मीरमधील अलिकडच्या काळात घडलेल्या दुःखद घटना लक्षात घेऊन आम्ही ४ आणि ५ मे रोजी मँचेस्टर आणि लंडनमध्ये होणारा 'द बॉलिवूड बिग वन शो यूके' पुढे ढकलण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. तसेच या दुःखद काळात शो पुढे ढकलणे हा योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटते. कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहो आणि तुमच्या पाठिंब्याची आणि समजुतीची आम्ही प्रशंसा करतो. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.
ALSO READ: अभिनेता परेश रावल स्वमूत्र प्यायचे स्वतः केला खुलासा, यांच्या सांगण्यावरून असे केले
पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने एक पोस्ट शेअर करून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी लिहिले होते, पृथ्वीवरील स्वर्ग असलेले काश्मीर नरकात बदलत आहे. निष्पाप लोकांना लक्ष्य केले जात आहे. 
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: 23 वर्षीय अभिनेत्री श्रीलीलाच्या घरी गोंडस मुलीचे आगमन,तिसऱ्यांदा आई बनली, शेअर केले फोटो

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

एफआयआरनंतर सोनू निगमने दिले स्पष्टीकरण, व्हिडिओ केले शेअर

कंगना राणौत दिल्लीतील सरकारी निवासस्थानी स्थलांतरित

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आल्यावर अभिनेता सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली

या घटनेमुळे संपूर्ण देश एक झाला आहे', पहलगाम हल्ल्यावर नवाजुद्दीनने व्यक्त केले दुःख

Pahalgam terror attack नंतर अभिनेता सलमान खानचा मोठा निर्णय

सर्व पहा

नवीन

इंडियन आयडल 12' विजेता पवनदीप राजनचा अपघात

बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणं हे नेहमीच स्वप्नवत वाटतं!" : वाणी कपूर 'रेड 2' च्या यशानंतर आनंदित

हाऊस अरेस्ट वादानंतर अजाज खानवर शारीरिक शोषणाचा आरोप, तक्रार दाखल

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर Omkareshwar Jyotirlinga

एफआयआरनंतर सोनू निगमने दिले स्पष्टीकरण, व्हिडिओ केले शेअर

पुढील लेख
Show comments