Publish Date: Fri, 12 Jun 2026 (15:45 IST)
Updated Date: Fri, 12 Jun 2026 (15:50 IST)
सोशल मीडियावर "अश्लील आणि आक्षेपार्ह" मजकूर पसरवल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे, वेब डेव्हलपर हिमांशू जांगरा आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुग्राममधील एका कॉमेडी शोदरम्यान केलेल्या वक्तव्यांमुळे मोरे आणि जांगरा वादात सापडले आहे. या वक्तव्यात एका महिलेसोबत जबरदस्तीने आणि तिच्या संमतीशिवाय केलेल्या वर्तनाचे समर्थन केल्याचा आरोप आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मोरे यांच्या शोमधील एका व्हायरल व्हिडिओ क्लिपच्या प्राथमिक तपासानंतर येथील नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, या व्हिडिओमध्ये महिला, संमती आणि मृत व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये होती, जी सार्वजनिक सभ्यतेचे उल्लंघन करतात.
महाराष्ट्र सायबरने कंटेंट क्रिएटर्स, डिजिटल इन्फ्लुएन्सर्स आणि इंटरनेट वापरकर्त्यांसाठी एक सूचना जारी केली असून, ऑनलाइन कंटेंट तयार करताना कायदेशीर नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी नागरिकांना वादग्रस्त मजकूर शेअर न करण्याचा इशाराही दिला आहे. त्यांनी सांगितले की, अश्लील मजकूर डाउनलोड केल्यास किंवा पसरवल्यास माहिती तंत्रज्ञान आणि फौजदारी कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया मनोरंजन टीम
वेबदुनिया पोर्टलची मनोरंजन टीम चित्रपट, मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि कलाकारांच्या आयुष्यातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स वाचकांना देते. चित्रपटांची परीक्षणे, सेलिब्रिटींच्या मुलाखती आणि ग्लॅमर विश्वातील पडद्यामागच्या रंजक बातम्या चवीने मांडण्याचे काम ही टीम करते.....
आणखी वाचा