Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चला हवा येऊ द्या फेम प्रसिद्ध अभिनेता सागर कारंडे यांची 61 लाखांची फसवणूक

Webdunia
शुक्रवार, 4 एप्रिल 2025 (18:59 IST)
सध्या ऑनलाईन फसवणूकच्या जाळ्यात अनेक जण अडकून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात सातत्याने वाढ होत आहे. या फसवणुकीला आता प्रसिद्ध अभिनेता देखील बळी पडत आहे.
 
चला हवा येऊ द्या फेम अभिनेता सागर कारंडे याची ऑनलाईन फसवणूक झाली असून सागर यांना 61 लाखांचा चुना लावला आहे. 
ALSO READ: 'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत
सध्या ऑनलाईन पैसे दुप्पट करण्याचे आणि पैसे मिळवण्याचे मेसेज सर्रास फिरत आहे. या अमिषाला बळी पडून अनेक जण आर्थिक प्रलोभनाला बळी पडत आहे. सायबर फ्रॉडला बळी पडत अभिनेता सागर कारंडे याने 61 लाख रुपये गमावले आहे. 

इंस्टाग्राम पोस्टला लाईक करून पैसे मिळवण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी सागर यांना आपल्या जाळ्यात ओढले. फेब्रुवारी 2025 मध्ये एका अनोळखी महिलेने व्हाट्सअप वरून सागर कारंडे यांना मेसेज करून संपर्क साधला आणि इंस्टाग्रामच्या काही पोस्ट ला लाईक करून पैसे मिळवण्याचे काम करून दिवसाला 6000 हजार रुपये कमवू शकाल असे सांगितले. सागरने हे काम करण्यास स्वीकारले आणि 10 वेळा त्याने काम केल्यास त्यांना 11 हजार रुपये मिळाले. या मुळे सागर यांचा या योजनेवर विश्वास बसला आणि त्याने काम सुरु ठेवण्यासाठी काही गुंतवणूक करून त्यासाठी 30 टक्के कमिशन मिळण्याचे आरोपी महिलेने सांगितले. 
ALSO READ: सेलिब्रिटीज साई बाबांच्या भक्तांसाठी जेवण बनवणार
सागरने काही रक्कम या मध्ये गुंतवली. या कामाचे पैसे एका वॉलेट’मध्ये जमा होत असल्याचे आरोपींनी दाखवले. या कामासाठी सागर यांनी 27 लाख रुपये गुंतवले. वॉलेट’माध्यम पैसे काढण्यासाठी टास्क पूर्ण करण्याचे सांगण्यात आले. नंतर सागर यांना अजून 19 लाख रुपये गुंतवायला सांगण्यात आले आणि त्यावर 30 टक्के कर असे एकूण 61 लाख रुपयांहून अधिक घेण्यात आले. मात्र ते पैसे चुकीच्या खात्यात गेल्याचे सांगून अजून पैसे भरण्यास सांगितले.
ALSO READ: 'मी पाठीशी आहे'चा ट्रेलर प्रदर्शित , श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्मचा अनोखा संगम
यावरून सागर यांना फसवणूक झाल्याचा संशय आला आणि त्यांने पोलिसांकडे धाव घेतली. आणि तक्रार दाखल केली. सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. सायबर पोलिसांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडण्याचे आवाहन जनतेला केले आहे.   
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

एफआयआरनंतर सोनू निगमने दिले स्पष्टीकरण, व्हिडिओ केले शेअर

कंगना राणौत दिल्लीतील सरकारी निवासस्थानी स्थलांतरित

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आल्यावर अभिनेता सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली

या घटनेमुळे संपूर्ण देश एक झाला आहे', पहलगाम हल्ल्यावर नवाजुद्दीनने व्यक्त केले दुःख

Pahalgam terror attack नंतर अभिनेता सलमान खानचा मोठा निर्णय

सर्व पहा

नवीन

इंडियन आयडल 12' विजेता पवनदीप राजनचा अपघात

बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणं हे नेहमीच स्वप्नवत वाटतं!" : वाणी कपूर 'रेड 2' च्या यशानंतर आनंदित

हाऊस अरेस्ट वादानंतर अजाज खानवर शारीरिक शोषणाचा आरोप, तक्रार दाखल

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर Omkareshwar Jyotirlinga

एफआयआरनंतर सोनू निगमने दिले स्पष्टीकरण, व्हिडिओ केले शेअर

पुढील लेख
Show comments