Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इरॉस नाऊ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत ‘डेट गॉन राँग २ ची क्वारंटाइन आवृत्ती !

Date gone wrong 2 on eros now
, मंगळवार, 30 जून 2020 (16:59 IST)
'डेट गॉन राँग' सीझन २ ही लॉकडाऊन दरम्यान प्रेमाच्या शोधात प्रवास करणार्‍या एकट्या व्यक्तींविषयीची एक मजेशीर मालिका इरॉस नाऊ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ७ जुलैपासून येत आहे. अभिषेक शर्मा आणि भक्ती मणियार यांचा अभिनय आणि करण रावल यांचे दिग्दर्शन, मनाला ताजेतवाने करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असून व्हर्च्युअल डेटिंग आणि त्याचे मनोरंजक परिणाम प्रेक्षकांना नक्कीच आवडतील.
 
भारतातील डेटिंग संस्कृती नवीन युगातील डेटिंग तंत्रांशी जुळवून घेत, लॉकडाऊन दरम्यान संपूर्णपणे घरच्या घरी शूट केलेला शो हा खर्‍या प्रेमाच्या शोधात असणारी खरी माणसे एकत्र आणते. परिपूर्ण नातेसंबंधाच्या त्यांच्या शोधामध्ये, एकटे असलेले लोक व्हर्च्युअल डेटिंगचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या संवादामधून समोर येणार अनपेक्षित परिणाम आणि कथानकाची अभूतपूर्व वळणे मजेदार परिणाम साधतात. त्यामुळे 'डेट गॉन राँग'- २ प्रेक्षकांना मजेशीर प्रवासावर घेऊन जाईल, यात शंका नाही कारण यात आभासी डेटिंगची चाचपणी आणि हलक्या फुलक्या विनोदी पद्धतीने केलेली मांडणी पाहायला प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
 
इरॉस इंटरनॅशनल पीएलसीचीच्या मालकीचा दक्षिण आशियाई एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म इरॉस नाऊने शॉर्ट-फॉर्ममधील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि वेब सीरिज 'डेट गॉन राँग' या त्यांच्या खूप लोकप्रिय मिनी मालिकेची दुसरी आवृत्ती प्रदर्शित करण्यास सज्ज झाले आहेत. इरॉस नाऊच्या मतानुसार क्विकी प्रकारातील डेट गॉन राँग २ ही एक खिळवून ठेवणारी कथा आहे. एका भागात लोकप्रिय रॅपर आणि त्याच्या चाहत्यांपैकी एक यांच्यातील मजेदार गंमत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, तर दुसऱ्या भागात वेगवेगळ्या देशातील दोन व्यक्तींमध्ये भावनिक क्षणांनी सुरू झालेले समीकरणाने घेतलेले आश्चर्यकारक वळण पाहायला मिळेल.
 
इरॉस ग्रुपच्या चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर रिधिमा लुल्ला म्हणाल्या, "मला खात्री आहे की व्हर्च्युअल डेटिंगच्या त्याच्या नवीन अनोख्या स्वरूपाचा शो संपूर्णपणे मनाला भीडणारा असू शकेल आणि सर्व प्रेक्षकांना आकर्षित करेल ".डेट गॉन राँग सीझन-२' ७ जुलैपासून फक्त इरॉस नाऊवर!    

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आत्मनिर्भर आजी....