Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये दया बेन परतणार,निर्मात्याने पुष्टी केली

Daya Ben will be back in 'Taraq Mehta Ka Ulta Chashma'
, मंगळवार, 24 मे 2022 (12:41 IST)
शैलेश लोढा यांनी शो सोडल्याने 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. शैलेश लोढा आता आणखी एका शोमध्ये सहभागी झाला आहे. दरम्यान, 'तारक मेहता'च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. शोमधील प्रसिद्ध पात्र दया बेन पुनरागमन करणार आहे. 'तारक मेहता'मध्ये जेठालाल आणि दया यांचे भांडण पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी याबाबत खुलासा केला आहे.
 
असित मोदी यांनी सांगितले की, कोणत्याही चांगल्या वेळी दया बेनला प्रेक्षकांसमोर येणार.'आमच्याकडे दया बेनचे पात्र परत न आणण्याचे कोणतेही कारण नाही. मागील काही काळ आपल्या सर्वांसाठी कठीण गेले आहेत. आता गोष्टी थोड्या चांगल्या झाल्या आहेत. 2022 मध्ये कोणत्याही चांगल्या वेळी आम्ही दया बेनचे पात्र परत आणणार आहोत. जेठालाल आणि दया भाभी यांचे मनोरंजन प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. द्या बेन बदलणार की दिशा वाकाणीच असणार ही माहिती अद्याप मिळालेली नाही. पण दया बेन नक्कीच परततील.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शूटिंग दरम्यान विजय देवरकोंडा-सामंथा रूथचा अपघात