दीपिका पादुकोण केवळ एक आघाडीची अभिनेत्री नाही, तर हजारों युवा मुली आणि महत्वाकांक्षी अभिनेत्रींसाठी प्रेरणा देखील आहे. तिचा व्यावसायिक आणि व्यक्तिगत प्रवास, तरुणाई समजून घेऊ इच्छिते आणि आत्मसात करू इच्छिते.
अगदी तसेच, जेव्हा अभिनेत्री, अमिता सुमनला तिला प्रेरित करणाऱ्या अभिनेत्रींविषयी विचारले असता, तिने लिहिले, 'दीपिका पादुकोण आणि मेरिल स्ट्रीप, दोघीही अभूतपूर्व आहेत.'
नेटफ्लिक्सवरील शैडो अँड बोन नामक सीरीजमधील, 23 वर्षीय अभिनेत्री अमिता सुमन जी मुळची नेपाळी आहे, जिचे बॉलीवुडमध्ये नाव कमावण्याची इच्छा आहे तिची पोस्ट, हे स्पष्ट करते कि, ती दीपिका पादुकोणची चाहती असून दीपिका आणि मेरिल स्ट्रीपला आपला आदर्श मानते.
तिचे दोन्ही आदर्श वेगवेगळ्या पिढीतून आहेत आणि वेगवेगळ्या चित्रपट उद्योगांशी नाते सांगतात मात्र, त्यांमध्ये एक समान धागा आहे तो हा, की या दोन्ही अभिनेत्री आपले काम अत्यंत उत्कटतेने करतात आणि या दोघी अतिशय प्रतिभावान अभिनेत्री असून आपल्या कामाने मोठा बदलाव आणू इच्छितात.
या आधी, अभिनेत्री मानुषी छिल्लरने देखील दीपिका अनेकांची प्रेरणा असल्याचे गौरवोद्गार काढले होते.
चित्रपट उद्योगात स्वत:च्या बळावर, दीपिकाने आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ती बी-टाउनची अनभिषिक्त सम्राज्ञी आहे, मग ती तिची सुंदरता असेल, ब्लॉकबस्टर चित्रपट असतील, टॉप बॅनर्स, प्रतिष्ठित ब्रांड डील्स, अंतर्राष्ट्रीय प्रकल्प किंवा चाहते, तिला हे सर्व काही विपुल मिळाले आहे. ती आपल्या एकूणच कार्यकुशलतेमुळे देशातील मुलींसाठी एक आदर्श रोल मॉडल ठरते आहे. यात काहीच आश्चर्य नाही की मुली केवळ तिचे कौतुक करत नाहीत तर तिच्या पाऊलांवर पाऊल ठेवून तिच्यासारखे बनण्याचे स्वप्न देखील बघतात.