Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दीपिकाच्या फोटोची खमंग चर्चा

Webdunia
गुरूवार, 12 मार्च 2020 (11:02 IST)
Instagram
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने नुकतेच बिकीनी फोटोशूट केले आहे. एका मासिकासाठी तिने हे बोल्ड फोटोशूट केले असून सोशल मीडियावर त्याचे काही फोटो दीपिकाने पोस्ट केले आहेत. दीपिकाने फोटो पोस्ट केल्यापासून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्‌सचा वर्षाव होत आहे. दीपिकाच्या बिकीनीमधील फोटोंनी सोशल मीडियावरचे तापमान वाढवले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. या फोटोंवर तिचा पती रणवीर सिंगनेही कमेंट केली आहे. 'बेबी, रहम करो यार', असे रणवीरने लिहिले आहे. लग्नानंतर अनेकदा दीपिकाला तिच्या फॅशन सेन्सवरून ट्रोल करण्यात आले.
 
रणवीरसोबत राहण्याचा परिणाम तुझ्यावर झालाय, असे अनेकांनीतिला चिडवले होते. मात्र मासिकासाठी केलेल्या या फोटोशूटनंतर दीपिकावर चांगल्या कमेंट्‌स वर्षाव होत आहे. काहींनी तिच्या बीचवरील फोटोचे मीम्ससुद्धा व्हायरल केले. त्यातला एक मीम दीपिकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. दीपिकाचा नुकताच 'छपाक' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाचे कौतुक झाले. ती लवकरच रणवीरसोबत झळकणार आहे. '83' या चित्रपटात रणवीर-दीपिका ऑनस्क्रीनसुद्धा पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लग्नानंतर ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचे सूत्रधार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा बंद

अ‍ॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीसोबतच अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही चाहत्यांची मने जिंकली

गायिका श्रेया घोषालने सूरतमधील कार्यक्रम रद्द केला, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतला निर्णय

अनुराग कश्यप विरुद्ध कायदेशीर कारवाई, सुरत कोर्टाने या दिवशी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली

सर्व पहा

नवीन

अभिनेता परेश रावल स्वमूत्र प्यायचे स्वतः केला खुलासा, यांच्या सांगण्यावरून असे केले

23 वर्षीय अभिनेत्री श्रीलीलाच्या घरी गोंडस मुलीचे आगमन,तिसऱ्यांदा आई बनली, शेअर केले फोटो

श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिराबद्दल संपूर्ण माहिती

अनुपम खेर दिग्दर्शित 'तन्वी द ग्रेट' चित्रपटाची नायिकाची काजोल ओळख करून देणार

'दक्षिण कैलास' नावाने ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर

पुढील लेख
Show comments