Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीपिकाचे विदेशी मीडियावर भडकण्याचे काय कारण?

dipika padukon
विदेशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दीपिकाला प्रियांका चोप्रा या नावाने हाक मारल्याने ती प्रचंड संतापली आहे. हा खरा वर्णभेद आहे, असा गंभीर आरोप तिने केला आहे. ही केवळ नाराज होण्याची गोष्ट नाही. याबाबत तुम्हीही नाराजी व्यक्त करायला हवी, असे ती भारतीय पत्रकारांना म्हणाली.
 
हे काही चुकून झालेले नाही. हा तर वर्णभेद आहे, अशा शब्दांत तिने आपला राग व्यक्त केला आहे. एका रंगाच्या दोन व्यक्ती एकच असू शकत नाहीत. भारतीय नागरिक या नात्याने तुम्ही त्यांना या काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत, असे आवाहनही दीपिकाने भारतीय पत्रकारांना केले. लॉरियलच्या एका कार्यक्रमात ती बोलत होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बॉडीगार्ड शेराच्या खांद्यावर जस्टिन बीबरच्या सुरक्षेची जबाबदारी