Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम करू शकलो : उर्मिला मातोंडकर

Balasaheb Thackeray
, शनिवार, 23 जानेवारी 2021 (19:40 IST)
दिवंगत शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरील आयोजित रक्तदान शिबिराला शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी हजेरी लावली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळालाही मातोंडकर यांनी वंदन केलं.  
 
" मी शिवसेनेचा भाग आहे म्हणून इथं आले असले तरी बाळासाहेबांबाबत माझ्या मनात नेहमीच आदर राहीला आहे. बाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम करू शकलो. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे. त्यामुळे त्यांचे विचार आणि स्वत: बाळासाहेब अजूनची आमच्यासोबतच आहेत", असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या. त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अक्षय कुमारने बच्चन पांडे यांना नवीन फोटोसह रिलीज तारखेची माहिती दिली, जाणून घ्या केव्हा होईल रिलीज