Festival Posters
✕

Dunki and Salaar Leaked शाहरुख खानच्या 'डंकी'नंतर 'सालार'ही लीक

Webdunia
शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (15:27 IST)
Dunki and Salaar Leaked प्रभास- श्रुती हसन-पृथ्वीराज सुकुमारन स्टारर चित्रपट 'सालार' अखेर चित्रपटगृहात दाखल झाला आहे. हा चित्रपट आधी 22 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर डंकी ला टक्कर देणार होता, परंतु नंतर डंकी एक दिवस आधी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता डंकी आणि सालार रिलीज झाल्यानंतर एक वाईट बातमी समोर येत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच ऑनलाइन लीक झाले आहेत.
 
'डंकी' छान प्रिंटमध्ये ऑनलाइन लीक
रिपोर्ट्सनुसार, 'डंकी' अनेक चॅनलवर लीक झाला आहे. अशीही बातमी आहे की शाहरुख खानचा हा चित्रपट एका साइटवर चांगल्या प्रिंटमध्ये देखील पाहिला जाऊ शकतो. रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट लीक झाल्यामुळे त्याच्या बॉक्स ऑफिस व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र या बातमीवर निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पायरसी वेबसाइट्सच्या विरोधात अनेक नियम बनवले गेले आहेत परंतु वेबसाइट्स त्यांच्या क्रियाकलापांपासून परावृत्त होत नाहीत. आता याचा शाहरुख खानच्या चित्रपटावर काय परिणाम होतो हे पाहायचे आहे.
 
'सालार'ही पायरसीचा बळी
चित्रपट प्रदर्शित करायचे आणि नंतर लगेचच ऑनलाइन लीक करायचे हा आता ट्रेंड झाला आहे. डंकी नंतर आता 'सालार'ही पायरसीचा बळी ठरला आहे. रिपोर्ट्सनुसार सालारचे एचडी व्हर्जन ऑनलाइन लीक झाले आहे. इतर चित्रपटांना लीक करणाऱ्या 3 ते 4 साइटवरही हा चित्रपट लीक झाला आहे. चित्रपटांच्या पायरसीमुळे खूप नुकसान झेलावं लागतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

नवीन

ब्लॉकबस्टर 'धुरंधर' अभिनेता रणवीर सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर

महिलेवर बलात्कार तर इतर तिघींवर लैंगिक अत्याचार; हॉलिवूड अभिनेता रसेल ब्रँडला साडेदहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Bhai Dooj 2026 : भारतातील या पवित्र मंदिरात भाऊ-बहिणीने एकत्र दर्शन घेतल्याने मिळते अपार पुण्य

Govardhan Puja 2026 : जिथे श्रीकृष्णाने केली होती गोकुळवासियांची रक्षा; गोवर्धन गिरीराज पर्वत

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

पुढील लेख
Show comments