Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

शिल्पा शेट्टी सांगते तेल-तूप खा पण 'वर्कआऊट' करा

शिल्पा शेट्टी सांगते तेल-तूप खा पण 'वर्कआऊट' करा
नुकताच जागतिक योग दिन साजरा झाला आणि भारतातही गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेकांनी हा एक दिवस का होईना पण योग करून आपणही आपल्या प्रकृती आणि संस्कृतीविषयी जागरूक असल्याचा दाखला दिला. आता योग म्हटलं की बॉलीवुड तारका शिल्पा शेट्टी कुंद्रा हिचं नाव आलंच.
 
शिल्पा शेट्टीने फिटनेसच्या सीडी काढल्या. शिवाय सोशल मीडियावर तिचे योग आणि व्यायाम करतानाचे व्हिडियो बरेच लोकप्रिय झाले आहेत. फिटनेस कॉन्शस शिल्पाचं म्हणणं आहे, "योग करून वजन कमी करता येत नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे."
 
योग त्यांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह घेऊन आल्याचं ती सांगते. इतकंच नाही तिचे पती राज कुंद्रा यांनीही योगा करणं सुरू केलं आहे आणि 8 किलो वजनही कमी केल्याचं ती सांगते.
 
डाएटिंग
 
डाएटिंगविषयी विचारल्यावर शिल्पा सांगतात, "लोकांना न्युट्रिशनची माहिती असणं गरजेचं आहे. 30% वर्कआउट असतो. मग ते जिम असो किंवा योग. मात्र, उत्तम आरोग्यासाठी 70% डाएट गरजेचा असतो. मात्र, डाएटचा अर्थ असा नाही की तुम्ही तेलाचा वापरच बंद करावा."
 
ती सांगते, "उत्तम फायबर्स खा, उत्तम कार्ब्ज खा. मी तर मनसोक्त जिरा आलू खाते. लोकं का खात नाही, मला कळत नाही. बटाटा खाल्ल्याने लठ्ठ होतो, असं कुणी सांगितलं. कुणी सांगितलं की जेवण ऑलिव्ह ऑईलमध्ये बनवावं. मी तर जेवणात तुपाचा भरपूर वापर करते आणि खातेसुद्धा. तुपाशिवाय माझं जेवण अपुरं आहे."
webdunia
आजकालचं आयुष्य धकाधकीचं आहे. आपण सर्वच कधी ना कधी डॉक्टरांकडे जातो आणि त्यांनी सांगितलेली भरमसाठ औषधं घेतो. मात्र, मोफत मिळणाऱ्या निसर्गाने दिलेल्या योगचा उपयोग आपण करत नाही.
 
तुमचं शरीर फार लवचिक नसलं तरीसुद्धा तुम्ही योग करू शकता, असं शिल्पाचं म्हणणं आहे.
 
त्या म्हणतात, "योग कुणीही करू शकतं. लहान-मोठा. कुठल्याही वयाची व्यक्ती. तुम्ही लवचिक असाल किंवा नसाल. मलाही अनेक आसनं करता येत नाही. मात्र, याचा अर्थ हा नाही की मी योग करणं सोडून द्यावं."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान मित्रासोबत केला पोल डांस, व्हिडिओ झाला वायरल