Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन

Webdunia
बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (08:06 IST)
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक बप्पी लाहिरी यांचे आज मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. बप्पी दा या नावाने प्रसिद्ध असलेले आलोकेश लाहिरी अवघ्या 69 वर्षांचे होते. त्यांनी भारतीय चित्रपटात संश्लेषित डिस्को संगीताचा वापर लोकप्रिय केला.

PTI वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. मुंबईतल्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते.
बप्पीदा नावानं प्रसिद्ध असलेल्या लहरी यांना ते परिधान करत असलेल्या प्रचंड सोन्यामुळंही वेगळी ओळख मिळाली होती.

वयाच्या चौथ्या वर्षी लता मंगेशकर यांच्या एका गाण्यात तबला वाजवून बप्पीदा प्रसिद्ध झाले होते. 80 च्या दशकात बप्पी लाहिरी यांच्या डिस्कोच्या तालावर संपूर्ण देश थिरकत होता. त्यामुळं त्यांना डिस्को किंग असं म्हटलं जात होतं. बॉलीवूडमध्ये संगीत डिजीटल बनवण्यात बप्पीदा यांचं मोठं योगदान होतं. बप्पी लाहिरी यांनी जवळपास पाच दशकांपेक्षा अधिक काळ संगीत क्षेत्रात काम केलं.
 
1970 आणि 80च्या दशकातल्या अनेक चित्रपटांना बप्पी लाहिरींनी संगीत दिलं होतं. चलते - चलते, डिस्को डान्सर, शराबी, नमकहलाल या सिनेमांमधली त्यांची गाणी गाजली.
 
शराबी चित्रपटासाठी बप्पी लहरी यांनी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. तसंच त्यांना फिल्मफेअरतर्फे जीवनगौरव पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.
 
2020 साली आलेल्या बागी 3 सिनेमामधलं 'भंकस' हे त्यांचं शेवटचं गाणं ठरलं.
 
डिस्को बीट्सवरची उडत्या चालींची गाणी हे बप्पीदांचं वैशिष्ट्य होतं.

डिस्को डान्सर सिनेमातलं 'आय अॅम अ डिस्को डान्सर' थानेदार सिनेमातलं 'तम्मा - तम्मा', द डर्टी पिक्चरमधलं 'ऊलाला ऊलाला', साहेब मधलं 'यार बिना चैन कहाँ रे' ही गाणी गाजली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

भारतातील सात पवित्र नद्यांना अवश्य भेट द्या

चित्रपट रामायणमध्ये या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीची एन्ट्री

बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केला पुनीत बालन स्टुडिओज निर्मित 'रानटी' चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

गेमिंगचा देव हिदेओ कोजिमा यांनी YRF स्पाय युनिव्हर्सच्या टायगर 3 चे कौतुक केले, म्हटले - अविस्मरणीय मनोरंजन!

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील ‘आनंदडोह’ चित्रपटाची घोषणा

पुढील लेख
Show comments