Marathi Biodata Maker

Farah Khan Mother Passed Away: फराह खानच्या आईचे निधन

Webdunia
शनिवार, 27 जुलै 2024 (11:04 IST)
प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानच्या आईचे निधन झाले आहे. फराह खानच्या डोक्यावरून आता आईची सावली गेली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर उद्योगजगतात शोककळा पसरली आहे. फराह आणि साजिद खानची आई मनेका इराणी यांचे निधन झाले. 
 
गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 
फराह आणि साजिदची आई देखील एक अभिनेत्री आहे. 1963 मध्ये आलेल्या 'बचपन' चित्रपटात त्यांनी काम केले होते.
मनेका इराणीच्या या चित्रपटात सलमान खानचे वडील सलीम खान पटकथा लेखक होते. मात्र, नंतर मनेका इराणीने चित्रपट निर्माता कामरानशी लग्न केले. पण कामरानला दारूचे व्यसन होते आणि ती तरुण असतानाच त्याने तिला एकटे सोडले. , फराहच्या आईने तिच्या मृत्यूच्या सुमारे 2 आठवडे आधी तिचा 79 वा वाढदिवस साजरा केला होता. 

मनेका इराणीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या दोन्ही मुलांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आई गेल्यावर साजिद खान आणि फराह खान वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखातसंपूर्ण इंडस्ट्री सामील झाली आहे.
 
Edited by - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

जॉर्जकुट्टी पुन्हा एकदा पोलिसांना चकमा देण्यासाठी सज्ज, मोहनलालचा 'दृश्यम ३' या दिवशी थिएटरमध्ये येणार

ओ रोमियो' रिव्ह्यू: शाहिद-तृप्तीचा दमदार अभिनय आणि विशालचा अ‍ॅनिमल हँगओव्हर

राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या जुळ्या मुलांची नावे ठेवली, त्यांचा आध्यात्मिक अर्थ जाणून घ्या

"जय हनुमान" चा भव्य लाँच हम्पीच्या ऐतिहासिक भूमीत होणार आहे, ज्यामध्ये ऋषभ शेट्टी भगवान हनुमानाची भूमिका साकारणार

राजपाल यादव यांच्या मदतीला सोनू सूद गेले धावून; म्हणाले- इंडस्ट्रीने त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे

सर्व पहा

नवीन

अभिनेता राजपाल यादव यांना जामीन मंजूर

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने राजस्थानमधून सहा आरोपींना अटक केली

Dadasaheb Phalke Punyatithi 2026 "भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके: शून्यातून विश्व कसं निर्माण केलं? वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास!"

लोकप्रिय ओडिया गायिका गीता पटनायक यांचे निधन

पुढील लेख
Show comments