Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘गोलमाल अगेन’ने १०० कोटींचा गल्ला जमवला

golmal again
, बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (10:21 IST)

रोहित शेट्टीचा ‘गोलमाल अगेन’ बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाई करतोय. फक्त चार दिवसांतच या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच कमाईने चांगला जोर धरला आहे. सुमारे ३३ कोटी रुपये पहिल्या दिवशी, सुमारे २८.५० कोटी रुपये दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशीही जवळपास २८ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. त्यामुळे आठवड्याअखेर चित्रपटाची कमाई सुमारे ८७ कोटी रुपये इतकी झाली होती. सोमवारी यात १६ कोटी रुपयांची भर पडल्यानंतर चार दिवसांत एकूण १०३ कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली.

 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घाबरलेल्या चकलीला काय म्हणाल?