Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चित्रीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

Webdunia
गुरूवार, 25 जून 2020 (21:50 IST)
लॉकडाऊननंतर चित्रपटसृष्टीतील  ठप्प झालेली कामे पुन्हा सुरू झाली आहेत. राज्य शासनाने काही अटी-शर्थींची बंधन लागू करत चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली असून, त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
 
करोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओ टी टी यांच्या चित्रीकरणासंदर्भात राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना ३० मे २०२० रोजी जारी केल्या होत्या. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करताना संबंधित संस्था/संघटना यांना काही अडचणी येत होत्या. त्यामुळेच सांस्कृतिक विभागामार्फत ३० मे २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. संबंधित संस्थांनी या स्पष्टीकरणात्मक सूचनांनुसार कार्यवाही करावी. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.
 
सरकारकडून चित्रीकरणासंदर्भात जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना
 
१. चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओ टी टी यांना ३० मे २०२० च्या शासन निर्णयानुसार चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. सदर चित्रीकरणाची परवानगी राज्य शासनाने तयार करून दिलेल्या एसओपी (मार्गदर्शक तत्वे) नुसार असेल. लॉकडाउन पूर्वी चित्रीकरणासाठी शासनाची परवानगी घेण्याची पद्धत यापुढेही तशीच असणार आहे.
 
२. लॉकडाउन पूर्वी ज्या पद्धतीने आरक्षण आणि चित्रीकरणाची परवानगी घेण्यात येत होती, तीच पद्धत आताही असणार आहे. चित्रीकरण करत असताना संबंधित निर्मात्याने आवश्यक त्या परवानग्या, स्व-घोषित पत्र, चित्रीकणासंबंधित सर्व माहिती चित्रनगरीला लिखित स्वरूपात कळविणे आवश्यक आहे.
 
३. प्रतिबंधित क्षेत्र नसलेला भाग आणि निषिद्ध क्षेत्र नसलेला भाग यामध्येच चित्रीकरणाला परवानगी आहे. केंद्र शासन व राज्य शासन यांनी लॉकडाउन बाबत दिलेल्या निर्णयाचे पालन करणे आवश्यक राहील.
 
४. मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पणे पालन करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे संबंधित निर्मिती संस्था/ निर्माते यांची असेल. चित्रीकरणादरम्यान सुरक्षेचे व स्वच्छतेचे नियम पाळले जात आहे की, नाही याची खातरजमा वेळोवेळी परवाना अधिकारी (लायसेन्स ऑथॉरिटी) यांच्यामार्फत करण्यात येईल.
 
५. चित्रीकरणादरम्यान कलाकार, तंत्रज्ञ सामाजिक अंतर ठेवून चित्रीकरण करू शकतात,संबंधित निर्मात्यांनी कमीत कमी मनुष्यबळात चित्रीकरण करणे आवश्यक आहे. संबंधित निर्मात्यांनी केंद्र व राज्य शासनाचे लॉक डाउन संदर्भातील नियम पाळणे आवश्यक आहे.
 
६. थर्मल स्क्रिनिंग, स्वच्छतेची काळजी चित्रिकरणच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. चित्रीकरणाच्या स्थळी जवळील करोना रुग्णालये याची माहिती दूरध्वनी क्रमांक निर्मिती संस्थेला असणे आवश्यक आहे. तसेच निर्मिती संस्थेने एक स्वतंत्र वाहन आरक्षित करून ठेवणे आवश्यक आहे, जेणे करून जर एखादा संशयित रुग्ण चित्रीकरणाच्या ठिकाणी आढळल्यास त्याला रुग्णालयात नेणे सोयीस्कर होईल. तसेच या वाहनात प्रथमोपचार पेटी, पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, शुगर टेस्टिंग किट असणे आवश्यक आहे.
 
७. राज्य शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या या मार्गदर्शक सूचना या कलाकार/ तंत्रज्ञ/ मदतनीस यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यात आले आहे.
 
८. चित्रिकरण स्टुडिओ आणि एडिटिंग कक्षात करोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना करणे, सर्व संबंधितांना, कर्मचाऱ्यांचे करोना विषाणूच्या संदर्भात प्रबोधन करून दक्षता घेण्याच्या सूचना देणे, चित्रीकरणस्थळी गर्दी टाळणे, कमीत कमी तंत्रज्ञांमध्ये चित्रिकरण स्टुडिओ आणि एडिटिंग कक्षात करोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना करणे, सर्व संबंधितांना, कर्मचाऱ्यांचे करोना विषाणूच्या संदर्भात प्रबोधन करून दक्षता घेण्याच्या सूचना देणे, चित्रीकरणस्थळी गर्दी टाळणे, कमीत कमी तंत्रज्ञांमध्ये काम करणे, मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप इन्स्टॉल करणे, साधनसामुग्रीची हाताळणी, चित्रीकरणाच्यावेळी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, कार्यालयांचे, चित्रिकरण स्थळांचे सॅनिटायझेशन आदी बाबींवर भर देण्याच्या अटी-शर्ती टाकण्यात आल्या असून या अटी शर्तींचे, शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे, निर्बंधांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालन करणे गरजेचे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा

ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला

सर्व पहा

नवीन

'द ग्रेट इंडियन कपिल शो' वादात अडकला,कायदेशीर नोटीस मिळाली

अद्भुत असा चंदेरी किल्ला

बिग बॉस 18 च्या घरात हिंसाचार,दोन स्पर्धकांमध्ये जोरदार हाणामारी

सलमान खानला धमकीचे मेसेज पाठवल्या प्रकरणी गीतकाराला अटक

'महावतार' चित्रपटात विकी कौशल चिरंजीवी परशुरामच्या भूमिकेत,चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणार

पुढील लेख
Show comments